NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / तुमच्याकडे असणाऱ्या सोन्याची विक्री करण्याचा विचार करताय? द्यावा लागेल कर; वाचा सविस्तर

तुमच्याकडे असणाऱ्या सोन्याची विक्री करण्याचा विचार करताय? द्यावा लागेल कर; वाचा सविस्तर

सध्या सोन्यामध्ये गुंतवणूक वाढली आहे. सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक एक सुरक्षित पर्याय मानण्यात येतो. पण तुम्हाला हे माहित आहे की सोने खरेदी करण्याबरोबरच सोन्याची विक्री करताना देखील कर द्यावा लागतो.

16

देशभरात कोरोनाचे संकट असताना (Coronavirus Pandemic) सोन्यामध्ये गुंतवणूक वाढली आहे. सोन्यामधील गुंतवणुकीला गुंतवणूकदारांनी अधिक पसंती दिली आहे. पण तुम्हाला हे माहित आहे का की, सोन्याची खरेदी करण्याशिवाय सोन्याची विक्री करताना देखील कर द्यावा लागतो. सोन्यावर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन (STCG) आणि लाँग टर्म कॅपिटल गेन (LTCG) कर द्यावा लागतो. वाचा सविस्तर

26

बाजारामध्ये सोन्याची किंमत दागिन्याचे वजन आणि कॅरेटप्रमाणे वेगवेगळी असते. मात्र, सोन्याच्या दागिन्यांची खरेदी केल्यानंतर त्याची किंमत आणि मेकिंग चार्जवर 3 टक्के जीएसटी आकारला जातो. दागिन्यांची रक्कम तुम्ही कोणत्याही पद्धतीने दिली तरी तुम्हाला जीएसटी द्यावा लागतो. दरम्यान सोनेविक्री करताना हे पाहिले जाते की, तो दागिना तुमच्याकडे किती काळापासून आहे, कारण त्या कालावधीनुसार कर लागू होतो.

36

सोन्यावर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन (STCG) कर तेव्हा आकारला जातो जेव्हा खरेदीच्या तारखेनंतर 3 वर्षांच्या आतमध्ये तुम्ही सोन्याचे दागिने विकता. दागिना विकल्यानंतर तुम्हाला मिळणाऱ्या रकमेतून इनकम टॅक्सस्लॅबनुसार तुमचा कर कापला जातो.

46

3 वर्षांपेक्षा जास्त जुने दागिने विकण्यावर लाँग टर्म कॅपिटल गेन कर द्यावा लागतो. LTCG नुसार, कराचा दर 20.80 टक्के आहे. 2020 च्या अर्थसंकल्पात LTCG वरील सेस 3 टक्क्यांवरून वाढवून 4 टक्के केला होता. टॅक्सच्या दरामध्ये सेसचा समावेश आहे. याआधी सोनेविक्रीवर 20.60 टक्के LTCG लागू होत असे.

56

कोणत्या मार्गांनी सोने खरेदी करता येईल?- 1. फिजिकल गोल्ड- अर्थात दागिने किंवा सोन्याच्या नाण्याच्या स्वरुपात सोनेखरेदी, 2. गोल्ड म्युच्यूअल फंड किंवा गोल्ड ETF, 3. डिजिटल गोल्ड, 4. चौथा- सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड्स (Sovereign Gold Bonds- SGB).

66

जेव्हा तुम्ही सोने विकता त्यावेळी देखील टॅक्स आकारला जातो. तुम्ही कोणत्या प्रकारे सोनेखरेदी केली आहे यावर हा कर निर्भर असतो.

  • FIRST PUBLISHED :