मुंबई : घर घ्यायचं किंवा रिन्यू करायचं असेल त्यासाठी आवश्यक असलेल्या पैशांची चणचण असेल तर आपल्याला बँकेतून पैसे घ्यावे लागतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेट वाढवल्याने गृह कर्ज महाग झाले आहेत. त्यातही काही बँकांनी ऑफर्स आणि स्वस्त लोन देण्याचा ग्राहकांना प्रयत्न केला आहे. तुम्ही जर होम लोन घेणार असाल तर तुमच्यासाठी कोणते पर्याय उत्तम असू शकतात ते यावरून ठरवू शकता.
होम लोन घेताना आधी कोणत्या बँकेचं होम लोन स्वस्त आहे ते पाहायला हवं. त्यासाठीच आज आम्ही तुमची मदत करणार आहोत. SBI बँक होम लोनसाठी 8.55% - 12.35% व्याजदर आकारते. प्रोसेसिंग फी 10,000 रुपये आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रमध्येही होम लोनसाठी तुम्ही अर्ज करू शकता. ही बँक ग्राहकांना 8 टक्के व्याजदराने लोन आकारते.
पंजाब नॅशनल बँक होमलोनसाठी 7.50% टक्के व्याजदर आकारते. जेवढी रक्कम जास्त आणि कालावधी जास्त तेवढी लोनची रक्कम वाढत जाते. 0.5 टक्के प्रोसेसिंग फी आकारते.
एचडीएफसी बँक 8.1 टक्के ते 8.9 टक्के व्याजदराने गृहकर्ज देत आहे. बँकेचा आरएलएलआर 8.1 टक्के आहे. 0.5 टक्के प्रोसेसिंग फी आकारते.
युनियन बँक ऑफ इंडियाचा आरएलएलआर दर 8.7 टक्के आहे. बँक 8.25 टक्के ते 10.1 टक्के व्याजदर देत आहे. 0.50 टक्के प्रोसेसिंग फी आकारते.
LIC HFL Home Loan 6.90 टक्क्यांपासून होम लोन आकारते. मात्र याचा कालावधी 5 वर्षांपासून 30 वर्षांपर्यंत असतो आणि रक्कम आणि कालावधी वाढेल तसे व्याजदर वाढत जाते. 0.25 टक्के प्रोसेसिंग फी आकारते.
अॅक्सिस बँक 0.50 टक्के प्रोसेसिंग फी आकारते. 6.90 टक्क्यांच्या व्याजदरावर होम लोन दिलं जातं.
बँक ऑफ बडोदा 6.90% ते 8.25% होम लोनसाठी व्याजदर घेते.