NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / News Year आधी ग्राहकांना दणका, पाहा आतापर्यंत कोणत्या बँकांनी किती वाढवलं लोन?

News Year आधी ग्राहकांना दणका, पाहा आतापर्यंत कोणत्या बँकांनी किती वाढवलं लोन?

तुम्ही लोन घेतलंय का? पाहा कोणत्या बँकेनं किती वाढवला EMI आणि लोन

110

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 7 डिसेंबर रोजी रेपो रेटमध्ये 0.35 बेसिस पॉईंटने वाढ केली. त्यानंतर इतर बँकांनी MCLR रेटमध्ये वाढ केली असून नवे दर लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार कोणत्या बँकेनं किती व्याजदर वाढवलं आणि किती EMI वाढवला ते जाणून घेऊया.

210

Union Bank चे लोन घेतलेल्या ग्राहकांना मोठा फटका बसला आहे. 11 डिसेंबरपासून या बँकेनं लोन आणि EMI मध्ये वाढ केली आहे. बँकेनं आपल्या MCLR मध्ये 5 बेसिस पॉईंट्सने व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे आता नवे व्याजदर हे 7.50 ते 8.60 टक्यांपर्यंत असतील अशी माहिती बँकेकडून देण्यात आली आहे.

310

बँक ऑफ इंडियाने 35 बेसिस पॉईंटने वाढ केली आहे. ही दरवाढ 7 डिसेंबरपासून लागू करण्यात आली आहे.

410

HDFC Bank ने देखील आपल्या MCLR रेटमध्ये वाढ केली आहे. 20 डिसेंबरपासून 35 बेसिस पॉईंटने ही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना लोन किंवा EMI साठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

510

Axis bank ने 17 डिसेंबरपासून आपल्या MCLR रेटमध्ये 30 बेसिस पॉईंटने वाढ केली आहे. त्यामुळे लोन आणि EMI वाढले आहेत. ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. 1 वर्षांसाठी MCLR रेट हा 8.75 टक्के असणार आहे.

610

Canara Bank या बँकेनं आपल्या MCLR रेटमध्ये 5 बेसिस पॉईंटने वाढ केली आहे. ही वाढ इतर बँकांच्या तुलनेत कमी असली तरी खिशाला कात्री लागणारच आहे. 7 डिसेंबरपासून व्याजदरात वाढ करण्यात आली आहे.

710

बंधन बँकेनं 30 नोव्हेंबरपासून आपल्या MCLR मध्ये वाढ केली आहे. त्यामुळे या बँकेकडून ज्यांनी लोन घेतलं त्यांना आधीपासून जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. बंधन बँक ग्राहकांना 8.30% पासून लोनसाठी वेगवेगळ्या योजना देते. या बँकेनं MCLR रेट वाढवल्याने EMI जास्त भरावा लागणार आहे.

810

Bank of Maharashtra या बँकेनं ग्राहकांना दणका दिला आहे. 14 डिसेंबरपासून 30 बेसिस पॉईंटने व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे लोन आणि EMI वाढला आहे. महाराष्ट्रात बँक ऑफ महाराष्ट्रचे ग्राहक मोठ्या प्रमाणत आहेत. त्यामुळे या बँकेनं व्याजदरात वाढ केल्याने मोठा फटका बसला आहे.

910

Bank of Baroda ने आपल्या व्याजदरात वाढ केल्याने EMI देखील वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांचं बजेट कोलमडलं आहे. 25 ते 30 बेसिस पॉईंटने टेन्यूयरनुसार व्याजदरात वाढ केली आहे. हे नवे दर 12 डिसेंबरपासून लागू होणार आहेत.

1010

SBI बँकेनं 25 बेसिस पॉईंटने दरवाढ केली आहे. 15 डिसेंबरपासून हे नवे दर लागू करण्यात आले आहेत.

  • FIRST PUBLISHED :