हा कोड आयएफएससी आहे. ही मोठी संख्या आहे, त्यामुळे अनेकदा लोकांना ती लक्षात ठेवता येत नाही. बँकेच्या पासबुकवर, चेकबुकवरही तुम्हाला आयएफएससी कोड लिहिलेला दिसतो. आज याचं महत्त्व आपण समजून घेणार आहोत.
आयएफएससी म्हणजे इंडियन फायनान्शिअल सिस्टम कोड. हा 11 अंकांचा अल्फा-न्यूमेरिक कोड आहे. प्रत्येक बँकेच्या प्रत्येक शाखेचा हा एक अनोखा कोड असतो
म्हणजे ज्या बँकेत तुमचं खातं असेल त्या बँकेची आयएफएससी ही त्याच शहरात असलेल्या त्याच बँकेच्या दुसऱ्या शाखेतील आयएफएससीपेक्षा वेगळी असेल. आरबीआयकडून जारी करण्यात आला आहे.
हा अल्फा-न्यूमेरिक कोड आहे. त्यात संख्या असलेली इंग्रजी अक्षरेही असतात. हे आपल्या पासबुकच्या किंवा चेकबुकवर कोपऱ्यात लिहिलेली असतात. या कोडनुसार ब्रांच देखील ओखळल्या जातात.
या 11 अंकी अंकी नंबरमध्ये पहिली 4 अक्षरं म्हणजे एचडीएफसीसारखी तुमच्या बँकेची ओळख असते. यानंतर 1 किंवा त्यापेक्षा जास्त अंक शून्य असतात. उरलेले आकडे ही तुमच्या शाखेची सांकेतीक ओळख असते. तो कोड तुम्ही अपलोड केला की तुमच्या शाखेचं नाव येतं.
आयएफएसीशिवाय तुम्ही एनईएफटी, आयएमपीएस आणि आरटीजीएस व्यवहार पूर्ण करू शकत नाही. या नंबरमुळे तुमच्या ऑनलाइन व्यवहारातील अडचण बऱ्याच अंशी टळते. प्रत्येक व्यवहार अखंडित व्हावा हा या क्रमांकाचा उद्देश आहे. याचा वापर आरबीआयकडून प्रत्येक इलेक्ट्रॉनिक आर्थिक व्यवहाराचा मागोवा घेण्यासाठी आणि लक्ष ठेवण्यासाठी केला जातो.