कार, बाईक, स्कूटर चालवताना वाहतुकीचे नियम पाळणे फार महत्वाचे आहे. जर नियमांचं उल्लंघन केलं तर तुम्हाला भरभक्कम दंड भरावा लागू शकतो.
नव्या नियमानुसार आता ऑनलाईन दंड आकारला जातो. मात्र कधी वाहतूक पोलिसांनी तुम्हाला थांबवलं तर या चुका करू नका नाहीतर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.
ट्रॅफिक पोलिसांनी तुम्हाला अडवलं तर तुम्ही थांबा, त्यांच्या आदेशाचं उल्लंघन करू नका. इंजिन बंद करून वाहतूक पोलिसांशी बोला, बोलताना कुठेही आपला आवाज वाढणार नाही आणि संयम राहील याची खात्री घ्या.
तुम्ही एकादा गंभीर नियम तोडला नसेल तर तुम्हाला वाहतूक पोलीस समज देऊ सोडून देऊ शकतात. मात्र उद्धटासारखं जर तुम्ही त्यांच्याशी वागलात तर तुम्हाला नुकसान होऊ शकतं.
तुम्ही ट्रॅफिकच्या कोणत्याही नियमाचे उल्लंघन केले असेल पण तुम्ही ते जाणूनबुजून केले नसेल तर चुकून केले असेल तर पोलिस अधिकाऱ्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. जर काही गैरसमज झाला असेल तर माफी मागावी, त्यात काही नुकसान नाही.
नियम सर्वांसाठी समान आहेत, त्यामुळे ,सर्वांनी पाळणं गरजेचं आहे. पोलिसांशी हुज्जत घालणं तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं.