मुदत ठेवी हा गुंतवणुकीचा पारंपारिक पर्याय आहे, जेथे गुंतवणूकदाराला सुरक्षित परतावा मिळतो. बहुतेक बँका सामान्य ग्राहकांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना 50 bps किंवा 0.50 टक्के जास्त व्याज देतात. तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि सुरक्षित मार्गानं एफडीमध्ये गुंतवणूक करून मजबूत परतावा मिळवू इच्छित असाल, तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे.
बंधन बँकेच्या ग्राहकांना आता 600 दिवसांच्या कालावधीसाठी FD वर 7.5 टक्क्यांपर्यंत जास्त व्याजदर मिळतो. दुसरीकडे, ज्येष्ठ नागरिक 0.50 टक्के किंवा 50 bps अधिक मिळवू शकतात, जे 600 दिवसांच्या मुदतीच्या FD साठी 8 टक्क्यांपर्यंत परतावा मिळतो.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक (SSFB) 999 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर सर्वसामान्यांसाठी 8.01 टक्के आणि ज्येष्ठ व्यक्तींना 8.26 टक्के व्याजदर देते. अलीकडेच बँकेनं एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेचे नवीन दर 2 नोव्हेंबर 2022 पासून लागू झाले आहेत.
युनिटी स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांच्या FD वर 8.3 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. हा व्याजदर 1 वर्ष 1 दिवसाच्या ठेवींवर उपलब्ध असेल. ज्येष्ठ नागरिकांना 2 वर्षे ते 3 वर्षे आणि 3 वर्षे ते 5 वर्षे मुदतीच्या FD वर 8.15 टक्के व्याजदर मिळेल.
AU स्मॉल फायनान्स बँक 2 वर्षे ते 3 वर्षे आणि 3 वर्षे ते 45 महिन्यांच्या मुदतीच्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना 8 टक्के व्याज देते. हे व्याजदर 10 ऑक्टोबर 2022 पासून लागू आहेत.