शेतीत अनेक पिके आणि झाडं घेतली जातात ज्यातून जास्ती जास्त शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होऊ शकेल. यामध्ये एक आहे सागवानचं झाड. बाजारात या लाकडाला मोठी मागणी असल्यानं शेतकऱ्यांना याची चांगली किंमतही मिळते.
बाजारात सागवानी लाकडाला मोठी मागणी असते. यामुळे शेतकऱ्यांना याची चांगली किंमत मिळते. तज्ज्ञांच्या मते जर एखाद्या शेतकऱ्याने सागवानच्या झाडांची लागवड केली तर काही वर्षात कोट्यवधी रुपयांची कमाई होऊ शकते.
सागवानच्या झाडाचं लाकूड भक्कम असतं आणि अनेक वर्षे टिकून राहतं. या लाकडाला कीड लागण्याचं प्रमाण कमी आहे. यामुळेच याचा वापर घराच्या खिडक्या, जहाजे, नाव, दरवाजे यांसाठी केला जातो.
सागवानची लागवड भारतातही कुठेही करता येते. यासाठी सप्टेंबर ते ऑक्टोबर महिना योग्य मानला जातो. मात्र पूर्ण वर्षात कोणत्याही काळात याची लागवड करू शकतो.
सागवानची झाडे लावण्यासाठी सात ते साडे सात इतका मातीचा पीएच उपयुक्त मानला जातो. जर तुम्ही या मातीत सागवानची लागवड केलीत तर झाडांची वाढ वेगाने होईल.
सागवानची लागवड केल्यानंतर त्यापासून उत्पन्न लगेच मिळत नाही. तीन वर्षांपर्यंत या झाडांची निगा राखण्याची गरज आहे. योग्य निगा राखल्यास त्यानंतर पुढच्या काळात या झाडांपासून शेतकऱ्याला फायदा मिळतो.
पूर्ण वाढ होण्यासाठी सागवानच्या झाडाला किमान १० ते १२ वर्षे वाट पाहावी लागेल. सागवानच्या झाडांमध्ये आंतरपीकही घेता येईल. यामुळे सागवानच्या शेतीला खर्च कमी येईल आणि नफाही वाढेल.
एखाद्या शेतकऱ्याने एक एकरात सागवानची ५०० झाडे लावली तर त्याला १० ते १२ वर्षांनी एक कोटी रुपयांपर्यंत किंमत मिळू शकते. जर एका झाडाच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर ३० ते ४० हजार रुपये मिळतील.