NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / भारतात बिसलेरी हे नावं कसं प्रसिद्ध झालं? हा रंजक प्रवास तुम्हाला माहितीय का?

भारतात बिसलेरी हे नावं कसं प्रसिद्ध झालं? हा रंजक प्रवास तुम्हाला माहितीय का?

Success Story of Bisleri: मिनरल वॉटर म्हटलं की डोळ्यासमोर पहिलं नावं येत ते म्हणजे बिसलेरी. भारतात पाणीही विकलं जातं यावर सुरुवातीला खूप हसं झालं. मात्र आज करोडो रुपयांची उलाढाल याच बिसलेरीने केली आहे. आज कुठेही गेलं तरी मिनिरल वॉटर म्हटलं की पहिल्यांदा बिसलेरी असं नाव तोंडातून येतं. मात्र आता हेच बिसलेरी लवकरच टाटा कन्झ्युमरकडे जाणार असल्याची चर्चा आहे.

19

पाणी एका बाटलीत पॅक करून विकण्याच्या आयडियावर हसणाऱ्यांची तोंडं बिसलेरीने बंद केली. बिसलेरीचा इथपर्यंतचा प्रवास नेमका कसा होता त्याच्या संघर्षाची आणि यशाची कहाणी तुम्हाला माहिती आहे का?

29

भारतातील मिनिरल वॉलरमधील भरवशाचा ब्रॅण्ड म्हणून आज बिसलेरी पहिल्या स्थानावर आहे. बिसलेरीची सुरुवात पहिल्यांदा इटलीमध्ये झाली. 1921 मध्ये फेलिस बिसलेरी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबातील डॉक्टर रोजेज कंपनीचे मालक बनले. सुरुवातीला या कंपनीने मलेरियावर औषधं तयार केली. त्यांची मुंबईतही एक शाखा होती.

39

खुसरो संतुक यांचे वडिल भारतात बिसलेरी कंपनीचे सल्लागार होते. ते डॉ. रोजेज यांचे चांगले मित्रही होती. त्यांना भारतात काहीतरी वेगळं करायचं होतं. त्यांची आयडिया यशस्वी ठरली. १९६५ खुसरो संतुक यांच्याद्वारे ठाण्यात पहिल्यांदा बिसलेरीचा वॉटर प्लान्ट सुरू करण्यात आला.

49

भारतात पहिल्यांदा पाणी विकणारी कंपनी म्हणून बिसलेरीचं नाव समोर आलं. अनेकांनी त्यांची चेष्टाही केली. त्यावेळी 1 रुपयाला ही पाण्याची बाटली मिळत होती. त्यावेळी १ रुपया म्हणजे खूप जास्त किंमत होती. मुंबईत पाण्याची गुणवत्ता त्यावेळी म्हणावी तेवढी चांगली नव्हती. त्यामुळे त्यांनी ही गरज ओळखून मुंबईतून हा व्यवसाय सुरु केला.

59

बिसलेरी पाण्यासोबत सोडाही लाँच केला. हे महागड्या हॉटेलमध्ये त्यावेळी मिळत असत. हळूहळू ही उत्पादनं सर्वसामान्य लोकांपर्यंत हे पोहोचायला लागली. लोक पाण्यापेक्षा जास्त सोडा खरेदी करायला लागले. त्यामुळे एक वेळ अशी आली की बिसलेरी पाणी बंद करावं का असा विचारही त्यावेळी संतुक यांच्या मनात आला.

69

त्यावेळी म्हणजे 1969 रोजी पारले कंपनीच्या चौहान ब्रदर्सना जेव्हा ही बातमी समजली. तेव्हा त्यांनी 4 लाख रुपयांमध्ये बिसलेरी इंडिया कंपनी विकत घेतली. त्यावेळी देशात 5 शाखा उपलब्ध होत्या. एक कोलकाता आणि 4 मुंबईमध्ये होत्या.

79

काही काळानंतर रिसर्च टीमच्या हे लक्षात आलं की रेल्वे स्टेशन, बस किंवा रस्त्यावर ढाब्यावर पाणी पिण्यायोग्य नसल्याने लोक सोडा खरेदी करून आपली तहान भागवतात. हीच गोष्ट लक्षात घेऊन चौहान यांनी बिसलेरीचे उत्पादन वाढवलं आणि अशा ठिकाणी पाणी विकण्यास सुरुवात केली.

89

ब्रॅण्डिंग, हटके प्रमोशन आणि पॅकेजिंग या जोरावर बिसलेरी अधिक लोकप्रिय देखील झाली. 2000 साली पुन्हा एक नवं संकट समोर आलं. एक्वाफिन, किनेल सारख्या ब्रॅण्डने मिनिरल वॉटर बाजारात आणलं. त्यामुळे बिसलेरीची मक्तेदारी संपुष्टात आली. त्यानंतर बिसलेरीने पॅकेजिंग बदलून वेगवेगळ्या आकारात पाण्याच्या बाटल्या बाजारात उपलब्ध करून दिल्या.

99

२००३ साली बिसलेरीने युरोपातही आपल्या व्यवसायाची घोषणा केली. आज भारतात बाटलीबंद पिण्याच्या पाण्यामध्ये बिस्लेरीचा बाजारपेठेतील हिस्सा ६०% आहे. आज बिस्लेरी आपल्या १३५ वनस्पतींच्या आधारे दररोज २० दशलक्ष लिटरपेक्षा जास्त पाणी विकून देश आणि जगात प्रसिद्ध झाली आहे. आज बिस्लेरी ५० हून अधिक ट्रक आणि ३५०० वितरकांच्या माध्यमातून ३.५ लाख किरकोळ विक्री केंद्रांपर्यंत पोहोचत आहे.

  • FIRST PUBLISHED :