NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, संपत्ती वाचून व्हाल थक्क

कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, संपत्ती वाचून व्हाल थक्क

मुख्यमंत्रिपदावर विराजमान होणाऱ्या सिद्धरामय्या इतक्या कोटींचे मालक

17

मुंबई : कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण होणार यावर सुरू असलेलं तीन दिवस राजकीय घमासान अखेर संपलं आहे. सिद्धरामय्या हे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसणार आहेत. तर डी के शिवकुमार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.

27

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या मालमत्तेवर नजर टाकल्यास 2023 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी 51 कोटी रुपयांच्या (51,93,88,910) एकूण मालमत्तेचे मालक असल्याचे सांगितले आहे. सिद्धरामय्या आणि त्यांची पत्नी पार्वती यांच्याकडे सुमारे 21 कोटी रुपयांची (21,32,31,991) जंगम मालमत्ता (movable assets) आहे.

37

ज्यामध्ये सिद्धरामय्या यांच्या नावावर 9 कोटी आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर 11 कोटींची मालमत्ता आहे. त्याचप्रमाणे, दोघांच्या नावे सुमारे 30 कोटींची (30,61,56,918) स्थावर मालमत्ता (immovable assets) आहे.

47

सिद्धरामय्या यांच्याकडे 9 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे, तर त्यांच्या पत्नीकडे सुमारे 20 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता (immovable assets) आहे.

57

सिद्धरामय्या आणि त्यांच्या कुटुंबावरही सुमारे 23 कोटी रुपयांचे (23,86,47,976) कर्ज आहे.

67

म्हैसूरच्या शारदा विलास लॉ कॉलेज, म्हैसूरमधून एलएलबी केलेले सिद्धरामय्या यांनी प्रतिज्ञापत्रात व्यवसायाचा आपल्या उत्पन्नाचा स्रोत म्हणून उल्लेख केला आहे.

77

प्रतिज्ञापत्रानुसार, सिद्धरामय्या यांच्या पत्नी प्रसिद्ध वायएस डायग्नोस्टिक्स प्रा. लि. संचालक हे BMMN Enterprises आणि PRY Projects LLP चे भागीदार आहेत.

  • FIRST PUBLISHED :