शेअर मार्केटमध्ये तुम्हाला पैसे गुंतवण्याची सवय असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. एका व्यक्तीवर रुग्णालयात पोहोचण्याची वेळ आली आहे. एखाद्या गोष्टीचा अतिरेक किती करावा यालाही मर्यादा आहे. अति तिथे माती होतेच तसाच प्रकार या व्यक्तीसोबतही घडला आहे. तुम्हाला जर अशी सवय असेल तर ती आताच कमी करणं गरजेचं आहे.
39 वर्शांच्या एका व्यक्तीने स्टॉक मार्केटमध्ये पैसे लावले. मात्र त्याचे एक वेगळीच नशा त्याला चढली. ही वाईट सवय मोडण्यासाठी त्याला अखेर रुग्णालय गाठण्याची वेळ आली. परिस्थिती एवढी वाईट होती की त्याला खर्च करण्यासाठी पैसेही खिशात नव्हते.
जवळपास 30 लाखहून अधिक रुपयांचं नुकसान झाल्यानंतरही त्याला पैसे गुंतवण्याचा मोह सुटत नव्हता. अखेर त्याच्या कुटुंबातील लोकांनी त्याला डॉक्टरांकडे नेलं त्यांनंतर जी परिस्थिती समोर आली ती वेळ तुमच्यावर येणार नाही याची काळजी घ्या.
ही धक्कादायक घटना बंगळुरू इथली असल्याची माहिती मिळाली आहे. डॉक्टर मनोज कुमार शर्मा, यांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्यावर वेगळ्या पद्धतीने उपचार करण्याची गरज आहे. शेअर मार्केटची लागलेली सवय सोडवणं ही आमच्यासाठी देखील पहिलीच केस आहे. त्यामुळे निश्चित वेगळी आव्हानंही आहेत.
गेल्या 4 वर्षांत रुग्णाने शेअर बाजारातून प्रचंड नफाही कमावला होता. बाजारातील त्याच्या अंदाजांबद्दल तो इतका दृढ होता की बाजार खराब असतानाही त्याने व्यापार सुरू ठेवला आणि अखेरीस गोष्टी बिघडू लागल्या मात्र त्यानंतरी तो थांबला नाही पैसे गुंतवतच राहिला आणि अखेर सगळंच उद्ध्वस्त झालं.
शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणं जोखमीचं आहे त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे पैसे गुंतवत असाल तर योग्य व्यक्तीच्या सल्ल्याने गुंतवा, त्याची सवय लागणं देखील घातक ठरू शकतं. ज्यामुळे तुमचे सेविंग केलेले सगळे पैसे बुडण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे ट्रेडिंग करताना जोखमीचा विचार करून पैसे गुंतवा.