तुम्ही जर SBI चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. SBI ने अत्यंत महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. आता प्रत्येक वेळी बँकेत फेऱ्या घालण्याची गरज नाही. तुम्हाला घरच्या घरीच काही सेवांचा लाभ घेता येणार आहे.
SBI चे YONO अॅप तुम्ही घरबसल्या डाऊनलोड करून लॉगइन केलं तर त्यावर पेमेंट करणं, FD करणं, RD करणं, गुंतवणूक करणं, लोनसाठी अर्ज करणं याशिवाय तुमचं बँक स्टेटमेंट आणि पासबुक सारख्या सुविधांचा लाभ घेता येणार आहे. बँकेनं स्वत: ट्वीट करून माहिती दिली आहे.
आता तुम्हाला YONO App वरून पासबुकही डाऊनलोड करता येणार आहे. त्यासाठी सर्वात आधी तुम्ही YONO लाइट अॅप डाऊनलोड करा. तिथे लॉग इन करा
सिलेक्ट माय अकाउंट पर्याय निवडा. त्यानंतर mpassbook पर्याय दिसेल. तिथे तुम्ही तुमचं खातं सिलेक्ट करा.
तुम्हाला तुमचं पासबुक पाहता येणार आहे. याशिवाय तुम्ही डाऊनलोड देखील करू शकता. तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने हे पासबुक डाऊनलोड करू शकता.