मुंबई : SBI ने ग्राहकांसाठी एक दिलासा देणारी बातमी आणली आहे. आपल्या MCLR दरात कोणताही बदल केला नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नुकताच सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. RBI ने यावेळी रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही.
त्याचा परिणाम दिसून येत आहे. देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या करोडो ग्राहकांना दिलासा दिला. बँकेने कर्जाचा व्याजदर ठरवण्यासाठी वापरलेला मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये कोणताही बदल केला नाही.
ग्राहक कर्जे एका वर्षाच्या किरकोळ खर्चावर आधारित कर्जदरावर आधारित असतात. अशा परिस्थितीत, MCLR मध्ये कोणताही बदल न केल्यामुळे वैयक्तिक कर्ज, वाहन आणि गृह कर्जाचे व्याजदर वाढणार नाही.
पर्यायी ग्राहकांना जास्त EMI भरावा लागणार नाही. वाढत्या महागाईमध्ये ग्राहकांना हा मोठा दिलासा मिळाला आहे.
बँकेने एका दिवसाच्या मुदतीच्या कर्जासाठी MCLR 7.95 टक्के ठेवला आहे, तर 1 महिना आणि 3 महिन्यांच्या कालावधीच्या कर्जासाठी व्याजदर 8.10 टक्के केलं आहे.
तुम्ही आता SBI कडून 6 महिन्यांचे कर्ज घेण्यासाठी गेलात तर तुम्हाला 8.40 टक्के MCLR नुसार व्याज द्यावे लागेल. त्याच वेळी, एक वर्ष, 2 वर्षे आणि 3 वर्षांच्या कर्जाचे व्याजदर अनुक्रमे 8.50 टक्के, 8.60 टक्के आणि 8.70 टक्के कायम ठेवण्यात आले आहेत.
SBI च्या वेबसाइटनुसार, हे दर 15 एप्रिल 2023 पासून लागू करण्यात आले आहेत. सलग 6 वेळा रेपो रेटमध्ये वाढ केल्यानंतर पहिल्यांदाच RBI ने रेपो रेटच्या दरवाढीला ब्रेक दिला आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.