NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / SBI, HDFC, ICICI बँकेत अकाउंट आहे? ही माहिती असायलाच हवी

SBI, HDFC, ICICI बँकेत अकाउंट आहे? ही माहिती असायलाच हवी

सर्वांचेच बँकेमध्ये अकाउंट आहे. मात्र अनेकदा आपल्याला आपल्या बँकेविषयी सविस्तर माहिती नसते. यामुळे अनेकांना दंडही भरावा लागतो. आज आपण SBI, HDFC, ICICI बँकेत मिनिमम बॅलेन्स किती असावे याविषयी जाणून घेणार आहोत.

  • -MIN READ

    Last Updated: February 13, 2023, 14:14 IST
15

सध्या बँक खात्यात मिनिमम बॅलेंस न ठेवल्यास दंड भरावा लागतो. बँका आपल्या ग्राहकांना बचत खात्यावर अनेक सुविधा देतात, परंतु या सुविधांसोबतच ग्राहकांना काही नियमांचेही पालन करावे लागते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिनिमम बॅलेंस ठेवणे. प्रत्येक बँकेची मिनिमम बॅलेंस लिमिट वेगळी असते, जी ग्राहकांना मेंटेन करावी लागते. जर ग्राहकाच्या अकाउंटच्या व्हेरिएंटनुसार मिनिमम बॅलेंस मेंटेन केले नाही तर बँक त्याच्याकडून दंड वसूल करते.

25

स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या अकाउंट्समध्ये क्षेत्राच्या हिशोबाने मिनिमम बॅलेंसचा नियम ठेवला आहे. ग्रामीण भागासाठी ही मर्यादा 1,000 रुपये आहे. सेमी-अर्बन एरियाच्या ग्राहकांना त्यांच्या खात्यात 2,000 रुपये ठेवावे लागतील. तर मेट्रो सिटीमध्ये ही मर्यादा 3 हजार रुपये आहे.

35

एचडीएफसी बँकेतील अॅव्हरेज मिनिमम बॅलेंसची लिमिट देखील रेजिडेंसीवर अवलंबून असते. ही लिमिट शहरांमध्ये 10,000 रुपये, सेमी-अर्बन एरियामध्ये 5,000 रुपये आणि ग्रामीण भागात 2,500 रुपये आहे.

45

ICICI बँकेने क्षेत्रानुसार त्यांच्या खात्यांमध्ये मिनिमम बॅलेंस ठेवण्याचा नियम ठेवला आहे. शहरी भागासाठी 10,000 रुपये, निमशहरी भागासाठी 5,000 रुपये आणि ग्रामीण भागासाठी 2,500 रुपये इतकी मर्यादा आहे.म्यूचुअल फंडवर कर्ज घ्यायचेय? एका क्लिकवर जाणून घ्या सर्व डिटेल्स

55

सध्या बँक अकाउंटमध्ये मिनिमम बॅलेंस न ठेवल्यास तुम्हाला दंड भरावा लागतो. पण येत्या काळात सर्व काही ठीक झाले तर बँक अकाउंटमध्ये मिनिमम बॅलेंस ठेवण्याची गरज भासणार नाही. वित्त राज्यमंत्री भागवत किशनराव कराड यांनी नुकतेच सांगितले होते की, मिनिमम बॅलेंस न ठेवणाऱ्या अकाउंट्सवरील दंड रद्द करण्याचा निर्णय बँकांचे संचालक मंडळ घेऊ शकतात. एका प्रश्नाच्या उत्तरात कराड श्रीनगरमध्ये म्हणाले होते, 'बँका या स्वतंत्र संस्था आहेत. त्यांचे संचालक मंडळ दंड माफ करण्याबाबत निर्णय घेऊ शकतात.'अचानक पैशांची गरज भासली तर 'हा' पर्याय आहे बेस्ट, सहज मिळेल कर्ज

  • FIRST PUBLISHED :