NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / RBI ते सर्वात मोठे 5 निर्णय! ग्राहकांसाठी चेक आणि कर्जासंदर्भातील नियम बदलले

RBI ते सर्वात मोठे 5 निर्णय! ग्राहकांसाठी चेक आणि कर्जासंदर्भातील नियम बदलले

देशावरील कोरोनाचे वाढते संकट पाहता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँक ग्राहकांसाठी असणाऱ्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. यानुसार चेक पेमेंट, ऑनलाइन पेमेंट, गोल्ड लोन यात बदल झाला आहे

17

आरबीआयने (Reserve Bank of India) सामान्य नागरिकांना दिलासा देत सोन्याच्या दागिन्यांवर कर्जाचे मूल्य (Gold Loan to Value LTV) वाढवले आहे. आता 90 टक्क्यांपर्यंत कर्ज मिळू शकेल. आतापर्यंत दागिन्यांच्या मुल्याच्या 75 टक्के कर्ज मिळत असे.

27

तुम्ही ज्या बँक किंवा नॉन-बँकिंग फायनान्सिंग कंपनीमध्ये गोल्ड लोनसाठी अर्ज कराल, त्याठिकाणी आधी तुमच्याकडे असणाऱ्या सोन्याची शुद्धता आणि गुणवत्ता तपासण्यात येते. सोन्याच्या गुणवत्तेच्या हिशोबाने तुम्हाला मिळणाऱ्या कर्जाची रक्कम ठरवली जाते. आरबीआयच्या नवीन नियमानुसात तुमच्या सोन्याच्या एकूण रकमेच्या 90 टक्के रकमेचे कर्ज तुम्हाला मिळू शकेल. 31 मार्च 2021 पर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार आहे

37

आरबीआयने चेक पेमेंट व्यवस्थेमध्ये बदल करत ही प्रक्रिया आणखी सुरक्षित केली आहे. 50000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्तीचे चेक व्यवहार करण्यासाठी नवीन प्रणाली लागू करण्यात आली आहे. पॉझिटिव्ह पे असं या नवीन प्रणालीचे नाव आहे.

47

पॉझिटिव्ह पे अंतर्गत चेक जारी करताना त्याच्या ग्राहकाने दिलेल्या माहितीच्या आधारावर चेकचे बँकेत पेमेंट होण्याआधी ग्राहकांना संपर्क केला जाईल. फसवणुकीच्या घटना कमी करण्यासाठी ही प्रणाली आत्मसात केली जाणार आहे.

57

लवकरच आता कार्ड आणि मोबाइलच्या माध्यमातून ऑफलाइन म्हणजेच इंटरनेटशिवाय सहज पेमेंट करता येईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) गुरुवारी पायलट स्कीमवर ऑफलाइन अर्थात इंटरनेटशिवाय कार्ड किंवा मोबाइलच्या माध्यमातून छोट्या पेमेंट संबंधित पेमेंट स्कीमची (Offline Payment Through Cards) घोषणा केली आहे.

67

आरबीआयकडून अशी माहिती देण्यात आली की, ग्रामीण भागात इंटरनेट नसल्यामुळे किंवा कमी प्रमाणात असल्यामुळे अनेकदा पेमेंट रद्द होतात. यामुळे कार्ड, वॉलेट किंवा मोबाइलचा वापर करून ऑफलाइन पेमेंटची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. यामुले डिजीटल व्यवहारांना चालना मिळेल.

77

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गुरुवारी स्टार्टअप्सना प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग (PSL) मध्ये समाविष्ट केले आहे. स्टार्टअप्सना बँकांकडून फंड्स मिळवण्यासाठी यामुळे सोपे होईल. यामध्ये आधी कृषी, MSME. शिक्षण आणि हाउसिंग इ. सेक्टर होते.

  • FIRST PUBLISHED :