NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / सुपरकूल! 9 मिनिटांत फुल्ल चार्ज, तुमची तयारी होण्याआधी फोन तयार

सुपरकूल! 9 मिनिटांत फुल्ल चार्ज, तुमची तयारी होण्याआधी फोन तयार

तुमच्या आधी तुमच्या स्मार्टफोन फुल्ल चार्ज होऊन तयार! किंमत आणि फीचर्सही जबरदस्त, फक्त 9 मिनिटांत होणार चार्ज

16

तुम्ही बाहेर जाण्यासाठी रेडी होण्याआधी तुमचा फोन फुल्ल चार्ज होणार अशी माहिती स्वत: कंपनीने दिली आहे. ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण हे खरंच आहे. अवघ्या 9 मिनिटांत तुमचा फोन आता पूर्ण चार्ज होणार आहे.

26

रिअलमेने स्पेनच्या बार्सिलोना येथे सुरू असलेल्या मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये आपला जीटी 3 फोन लाँच केला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, स्मार्टफोनला पूर्णपणे चार्ज होण्यासाठी फक्त 9.5 मिनिटे लागतात. याची किंमत साधारण 649 डॉलर ( 53,543 रुपये) असल्याचं सांगण्यात आलं आहे.

36

रिअलमीने पहिल्यांदाच असा फोन लाँच केला आहे जो 9 मिनिटांत पूर्ण चार्ज होतो. या फोनसोबत 240W चा चार्जर देण्यात आल्या आहेत. जगातील सर्वात वेगवान आणि सुपर पावर चार्जर असल्याचा दावा कंपनीने केला आहे. एवढा फास्ट चार्जिंग देणारी रिअलमी ही जगातील पहिलीच कंपनी असावी.

46

हा फोन 20 टक्के चार्ज करण्यासाठी फक्त 80 सेकंद घेतो असा दावा कंपनीने केला आहे. एवढ्या जास्त पावरचा चार्जर असला तरी बॅटरीचं कोणतंही टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही असंही म्हटलं आहे.

56

या फोनमद्ये 4600mAh बॅटरी दिली आहे. 9 मिनिटे आणि 30 सेकंद चार्ज व्हायला लागतात. कंपनीने चार्जिंग आणि बॅटरी या दोन्हीच्या सुरक्षेची काळजी घेतल्याचं म्हटलं आहे.

66

या फोनमध्ये अनेक नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. तुम्ही रिअलमीच्या वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. हा फोन भारतात कधी लाँच होणार याबाबत सध्या कोणतीही माहिती देण्यात आली नाही. मात्र भारतात देखील या फोनची प्रतिक्षा आहे.

  • FIRST PUBLISHED :