US फेड बँकेनं व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता RBI ने देखील मॉनिटरी पॉलिसीसंदर्भात घोषणा केली आहे.
महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी RBI ने पुन्हा एकदा 0.25 बेसिस पॉईंट्सने रेपो रेटमध्ये वाढ केली आहे.
RBI च्या या निर्णयानंतर शेअर मार्केटवर मोठा परिणाम झाला आहे.
RBI ने 0.25 बेसिस पॉईंट्सने रेपो रेटमध्ये वाढ केल्यामुळे आता होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोन महाग झालं आहे. याशिवाय EMI मध्ये देखील वाढ करण्यात आली आहे.
शेअर मार्केटमध्ये बँकांच्या शेअर्समध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली. बँकेच्या शेअर्समध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली.
ऑटो शेअर्स मात्र लाल रंगात दिसायला लागले. शेअर्सच्या किंमती घसरल्या. हाउसिंग फायनान्सचे शेअर्स देखील अप डाऊन होत असल्याचं दिसलं.