US फेडने पुन्हा एकदा आपल्या व्याजदरात वाढ केली आहे. त्यानंतर आता RBI चा मोठा निर्णय आज होणार आहे. हा निर्णय तुमचं बजेट बिघडवण्याची शक्यता आहे. आज RBI पुन्हा रेपो रेटमध्ये वाढ करण्याची शक्यता आहे.
सकाळी 10 वाजत RBI आपला निर्णय जाहीर करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार RBI ०.२५ बेसिस पॉईंट्सने रेपो रेटमध्ये वाढ करण्याची शक्यता आहे.
RBI च्या या निर्णयामुळे होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोन महाग होण्याची शक्यता आहे.
तुम्ही जर कर्ज घेतलं असेल तर तुमचा EMI वाढेल जर घेणार असाल तर कर्ज महाग मिळेल.
आतापर्यंत ही दरवाढ सहाव्यांदा करण्यात आली आहे. तर डिसेंबर महिन्यातच RBI ने पुन्हा रेपो रेट वाढतील असे संकते दिले होते.
तज्ज्ञांच्या मते आणखी सहा महिन्यांपर्यंत रेपो रेट वाढण्याची शक्यता, आज त्याबाबतही RBI कडून संकेत मिळणार का याकडे संपूर्ण देशाचं लक्ष.