NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / Ratan Tata Birthday : रतन टाटांचे ते गोल्डन रूल्स, ज्यांच्या आधारे उभा केला कोट्यवधींचा व्यवसाय

Ratan Tata Birthday : रतन टाटांचे ते गोल्डन रूल्स, ज्यांच्या आधारे उभा केला कोट्यवधींचा व्यवसाय

Ratan Tata birth day : ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा आज 85 वर्षांचे झाले आहेत. त्यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला. रतन टाटा हे 1990 ते 2012 पर्यंत टाटा समूहाचे अध्यक्ष होते. ऑक्टोबर 2016 ते फेब्रुवारी 2017 या कालावधीत ते हंगामी अध्यक्ष होते. त्यांच्या साध्या स्वभावामुळे आणि दूरदृष्टीमुळे ते प्रत्येक भारतीयाचे आदर्श आहेत.

16

रतन टाटा यांचा विश्वास आहे की जीवनात काहीही साध्य करणे अशक्य नाही. ते एकदा म्हणाले होते, "जे काम करणे सामान्य माणसाला अशक्य वाटते ते काम करण्यात मला सर्वात जास्त आनंद मिळतो." एक लाख रुपयांच्या नॅनोची अशक्य गोष्ट त्यांनी शक्य करून दाखवली आणि अशक्य काहीच नाही हे दाखवून दिले.

26

रतन टाटा मानतात की जर तुम्हाला वेगाने चालायचे असेल तर तुम्ही एकटेच चालले पाहिजे, पण जर तुम्हाला लांब चालायचे असेल तर एकत्र चाला. टाटा यांनी नेहमीच टीमवर्कला महत्त्व दिले आणि यामुळे त्यांनी टाटा समूहाला मोठ्या उंचीवर नेले.

36

रतन टाटा हे टीकेला घाबरणारे नाहीत. ‘लोकांनी तुमच्यावर फेकलेले दगड गोळा करा आणि स्मारक उभारण्यासाठी त्यांचा वापर करा’ हा त्यांचा मंत्र आहे.

46

टाटा मानतात की मौलिकता ही यशाची गुरुकिल्ली आहे. जो माणूस इतरांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो, तो काही काळ यशस्वी होतो, परंतु हे यश दीर्घकालीन नसते.

56

रतन टाटा अनेकदा म्हणतात की माणसाची मानसिकता ठरवते की तो यशस्वी होणार की अयशस्वी. ते म्हणतात की लोखंडाला कोणीही नष्ट करू शकत नाही. परंतु त्याला गंज लागू शकतो. त्याचप्रमाणे माणसाला त्याच्या स्वतःच्या मानसिकतेशिवाय काहीही नष्ट करू शकत नाही.

66

रतन टाटा अनेकदा म्हणतात की माणसाची मानसिकता ठरवते की तो यशस्वी होणार की अयशस्वी. ते म्हणतात की लोखंडाला कोणीही नष्ट करू शकत नाही. परंतु त्याला गंज लागू शकतो. त्याचप्रमाणे माणसाला त्याच्या स्वतःच्या मानसिकतेशिवाय काहीही नष्ट करू शकत नाही.

  • FIRST PUBLISHED :