मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनी » Ramdan 2023 : काजू-बदामपेक्षा खजूराने खाल्ला भाव, यंदाच्या रमजानमध्ये सर्वाधिक दर
News18 Lokmat | March 29, 2023, 08:21 IST | Mumbai, India

Ramdan 2023 : काजू-बदामपेक्षा खजूराने खाल्ला भाव, यंदाच्या रमजानमध्ये सर्वाधिक दर

रमजानचा रोजा खजूर खाऊन सोडणं झालं महाग, मोजावे लागणार दुप्पट पैसे

काजू आणि बदामपेक्षा सर्वात जास्त किंमत खजुराची झाली आहे. खजूराने चांगलाच भाव खाल्ला आहे. रमजान महिन्यात खजूर हा सर्वात महत्त्वाचा मानला जातो. रोजा सोडताना खजूर खाऊन तो सोडतात. त्यामुळे खजुराला महत्त्व आहे.
1/ 6

काजू आणि बदामपेक्षा सर्वात जास्त किंमत खजुराची झाली आहे. खजूराने चांगलाच भाव खाल्ला आहे. रमजान महिन्यात खजूर हा सर्वात महत्त्वाचा मानला जातो. रोजा सोडताना खजूर खाऊन तो सोडतात. त्यामुळे खजुराला महत्त्व आहे.

2/ 6

खजुरासाठी आता दुप्पट पैसे मोजावे लागणार आहेत. साधारण 1 किलो खजूर 1300 पर्यंत मिळतात. मात्र आता 2600 रुपयांना हे खजूर मिळत आहेत.

3/ 6

अर्थात सगळ्या सरसकट खजुराची किंमत 2600 रुपये नाही. खजुराच्या क्वालिटीवर आहे. मात्र उत्तम दर्जाचा खजूर घेतला तर तो 2600 रुपयांना मिळत आहे.

4/ 6

रमजानमुळे खजुरांच्या मागणीत वाढ झाली आहे. ही छायाचित्रे हैदराबादमधील खजुराच्या दुकानातील आहेत.

5/ 6

एका खजूर विक्रेत्याने सांगितले, "मी 22 वर्षांपासून खजूर व्यवसाय करतो. आम्ही अजवा खजूरसह अनेक प्रकारच्या खजूर विकतो.

6/ 6

तेलंगणातील एक दुकानदाराने सांगितलं की त्याच्याकडे 120 रुपये प्रति किलो ते 2600 रुपये किलोपर्यंत खजूर आहेत. इराक, इराण, येमेनमधून खजूर आयात केले जातात. , सौदी अरेबिया, ओमान, अल्जेरिया आणि इतर अनेक देशांमधील उत्तम दर्जाचे खजूर असल्याचं त्यांनी सांगितलं.

Published by:Kranti Kanetkar
First published:March 29, 2023, 08:21 IST

ताज्या बातम्या

सुपरहिट बॉक्स