राकेश झुनझुनवाला यांच्या मालकीच्या अकासा एअर या खासगी विमान कंपनीने भारतीय विमान वाहतूक क्षेत्रात आपली वाटचाल सुरु केली आहे. अकासा एअरच्या पहिल्या विमानाने आज टेक ऑफ झालं आहे.
अकासा एअरलाइनचे पहिले फ्लाइट मुंबईहून रविवारी सकाळी 10.05 वाजता निघाले आणि अहमदाबादला सकाळी 11.25 वाजता पोहोचले. Akasa Air 13 ऑगस्टपासून आणखी अनेक मार्गांवर आपली सेवा सुरू करणार आहे.
अकासाच्या पहिल्या व्यावसायिक विमानाने मुंबई ते अहमदाबाद असा प्रवास केला आहे. आकासा एअरच्या पहिल्या फ्लाइटच्या उद्घाटन समारंभात विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया देखील दिसले. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आकासाच्या पहिल्या व्यावसायिक उड्डाणाला हिरवा झेंडा दाखवला. त्यांच्यासोबत केंद्रीय राज्यमंत्री व्ही.के.सिंगही उपस्थित होते.
राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा यांच्याकडे अकासा एअर शेअरमध्ये सर्वाधिक भागिदारी आहे. या विमान कंपनीत त्यांची एकूण भागिदारी 45.97 टक्के आहे. याशिवाय विनय दुबे, संजय दुबे, नीरज दुबे, माधव भातकुली, पीएआर कॅपिटल व्हेंचर्स, कार्तिक वर्मा हेही आकासा एअरचे प्रमोटर्स आहेत.
राकेश झुनझुनवाला यांच्यानंतर विनय दुबे यांची यात 16.13 टक्के भागीदारी आहे. आकासा एअर 13 ऑगस्टपासून बंगळुरू-कोची, 19 ऑगस्टपासून बंगळुरू-मुंबई आणि 15 सप्टेंबरपासून चेन्नई-मुंबईसाठी आपली सेवा सुरू करणार आहे.
अकासा एअरची तिकीट विक्री 22 जुलैपासून पहिल्या फ्लाइटच्या तिकीटांची विक्री सुरू केली आहे. Akasa Air सध्या दोन 737 MAX विमानांसह ऑपरेशन सुरू करत आहे. Akasa Air ने बोइंगच्या 737 MAX विमानाच्या 72 युनिट्सची ऑर्डर दिली आहे. दर महिन्याला दोन नवीन विमाने जोडण्याचा एअरलाइनचा प्रयत्न आहे. कंपनी दर 12 महिन्यांनी 12 ते 14 विमाने जोडण्याची तयारी करत आहे. मार्च 2023 पर्यंत 18 विमानांची डिलिव्हरी करायची आहे.
मुंबई ते अहमदाबाद एकमार्गी भाडे 3,948 रुपये ठेवले आहे. बोईंग 737 MAX विमानाने एअरलाइन आपले पहिले व्यावसायिक उड्डाण सुरू करणार आहे. अकासा एअर देशांतर्गत विमान वाहतूक क्षेत्रात इंडिगो आणि टाटा समूहाच्या विमान कंपन्यांशी स्पर्धा करेल, असा विश्वास आहे.