NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / स्वस्त किंमतीत खरेदी करा प्रॉपर्टी, 29 सप्टेंबरपर्यंत ही बँक देतेय संधी

स्वस्त किंमतीत खरेदी करा प्रॉपर्टी, 29 सप्टेंबरपर्यंत ही बँक देतेय संधी

पीएनबी रेसिडेन्शिअल/कमर्शिअल प्रॉपर्टीजचा राष्ट्रव्यापी ऑनलाइन मेगा ई-लिलाव (Auction) करणार आहे. हा लिलाव पारदर्शी पद्धतीने 15 आणि 29 सप्टेंबर रोजी केला जाणार आहे.

17

घर घेण्याचे स्वप्न अनेकांचे असते. या लोकांपैकी तुम्ही एक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. घर किंवा दुकान खरेदीचा विचार तुम्ही करत असात तर देशातील दुसरी मोठी सरकारी बँक पंजाब नॅशनल बँक (PNB) ही संधी देत आहेत.

27

पीएनबी रेसिडेन्शिअल/कमर्शिअल प्रॉपर्टीजचा राष्ट्रव्यापी ऑनलाइन मेगा ई-लिलाव (Auction) करणार आहे. हा लिलाव पारदर्शी पद्धतीने 15 आणि 29 सप्टेंबर रोजी केला जाणार आहे. जाणून घेऊयात तुम्ही कसे या प्रक्रियेत सहभागी होऊ शकता आणि खरेदी करू शकता.

37

या कारणामुळे केला जात आहे लिलाव- बँकेच्या या संबंधित शाखांनी वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देखील दिल्या आहेत, त्याचप्रमाणे पीएनबीने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून देखील याबाबत पोस्ट केली आहे. ज्या संपत्तीचा लिलाव होणार आहे, ती अशा लोकांती प्रॉपर्टी आहे ज्यांनी बँकेचे कर्ज चुकवले नाही आहे आणि त्या प्रॉपर्टीज बँकेकडे गहाण आहेत. त्यामुळे ही थकबाकी वसुलण्याठी बँकेकडून लिलाव केला जाणार आहे.

47

बँकेने दिलेल्या माहितीनुसार लिलावामध्ये इच्छूक असणाऱ्या व्यक्तींनी e-Bkray (e-B-क्रय) पोर्टल https://ibapi.in वर जाऊन नोंदणी करू शकतात. याठिकाणी तुम्हाला नियम व अटी, कायदे, बिड साइझ, मालमत्तेचे मुल्य, ठिकाण ही माहिती मिळवता येईल. या लिलावामध्ये भाग घेण्यासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

57

बिडर/खरेदीदाराचे रजिस्ट्रेशन-बिडरला या लिलावासाठी लिलावाच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर मोबाइल नंबर आणि ईमेल आयडीच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन करावे लागेल. बिडला आवश्यक ते सर्व केवायसी डॉक्यूमेंट्स अपलोड करावे लागतील. KYC डॉक्यूमेंट्स ई-लिलाव सर्व्हिस प्रोव्हायडरद्वारे व्हेरिफाय केले जातील. यामध्ये साधारण 2 कामकाजाचे दिवस जाऊ शकतात.

67

बँक कोणत्या सर्कलमध्ये कोणत्या प्रकारच्या मालमत्तेचा कोणत्या दिवशी लिलाव करणार आहे, कोणाशी संपर्क साधता येईल, मालमत्तेची रिझर्व्ह रक्कम काय आहे ही सर्व माहिती https://etender.pnbnet.in:8443/banks/detail/pnb/MTQy वर उपलब्ध आहे.

77

मालमत्तेच्या ई-लिलावासाठी पीएबीची सविस्तर नोटीस https://www.pnbindia.in/EAuction.aspx वर उपलब्ध आहे. ज्यामध्ये अन्य माहितीबरोबरच लिलावाची वेळ देखील आहे.

  • FIRST PUBLISHED :