NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / PPF खात्यातून मुदतीपूर्वी पैसे काढता येतात का? काय सांगतो नियम

PPF खात्यातून मुदतीपूर्वी पैसे काढता येतात का? काय सांगतो नियम

PPF पूर्ण होण्याआधी पैसे काढता येतात का? त्यासाठी किती दंड बसतो, पाहा काय सांगतो नियम

16

मुंबई : बऱ्याचदा टॅक्समधून सूट मिळावी म्हणून तुम्ही PPF  मध्ये पैसे ठेवता. यामध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं आहे असं म्हटलं जातं. यावर करातूनही सूट मिळते.

26

त्यासोबत जास्त व्याजदर मिळतं. मात्र कधीकधी आपत्कालीन परिस्थिती ओढवते आणि त्यामुळे आपल्याला पैसे काढावे लागतात. मग अशावेळी तुम्ही PPF  मधून पैसे काढू शकता का? त्यासाठी किती दंड लागतो नियम काय सांगतो हे जाणून घेऊया.

36

PPF खात्यावर 15 वर्षांचा लॉकिग कालावधी दिला जातो. त्यानंतर तुम्हाला हवं तर तुम्ही पुन्हा 5-5 असे 10 वर्ष हा कालावधी वाढवू शकता. नाही तर तुम्ही 15 वर्ष पूर्ण झाल्यावर पैसे काढून घेऊ शकता. पण त्याआधी तुम्हाला पैसे काढायचे असतील तर

46

उच्च शिक्षणासाठी तुम्ही 5 वर्ष पूर्ण झालल्यानंतर पैसे काढू शकता. मात्र त्यासाठी तुम्हाला अॅडमिशन आणि फी भरण्यासाठी लागणारी रिसिट दोन्ही जोडणं आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला पैसे काढण्यासाठी अर्ज करता येणार आहे.

56

तुम्ही अन्य देशाचं नागरिकत्व स्वीकारल्यानंतर तुम्ही खातं बंद करू शकता. याशिवाय जर तुम्हाला पैसे काढायचे असतील तर 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ठराविक रक्कम काढता येते. मात्र पूर्ण रक्कम तुम्हाला 15 वर्षांनंतरच मिळणार आहे. मध्येच खातं बंद केलं तर तुमच्या खात्यावर कमी व्याज लागू होतं आणि 1 टक्के पैसे दंड म्हणून कापून घेतले जातात.

66

पीपीएफ खात्याचे हे फायदे तुम्ही वाचल्यानंतर नक्की यामध्ये गुंतवणूक करू शकता. एवढंच नाही तर ही गुंवणूक फायद्याची देखिल मानली जाते.

  • FIRST PUBLISHED :