मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. बँकेने आपल्या ग्राहकांसाठी एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा दुप्पट केली आहे. आता पीएनबी ग्राहक त्यांच्या डेबिट कार्डद्वारे 1 दुप्पट पैसे काढू शकतात. पूर्वी त्याची मर्यादा फक्त 50 हजार रुपये होती.
व्हिसा गोल्ड डेबिट कार्ड, प्लॅटिनम मास्टरकार्ड आणि रुपे कार्डवरील एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा वाढवून एक लाख रुपये करण्यात येत असल्याचे पीएनबीने म्हटले आहे. यापूर्वी या कार्डधारकांना एटीएममधून केवळ 50 हजार रुपये काढता येत होते. ग्राहकांच्या सोयीसाठी डेबिट कार्ड व्यवहाराची मर्यादा लवकरच वाढवण्यात येणार असल्याचे बँकेने म्हटले आहे.
बँकेने रुपे सिलेक्ट आणि व्हिसा सिग्नेचरसारख्या कार्डधारकांसाठी एटीएम कॅशची दररोजची पैसे काढण्याची सुविधा 50 हजार रुपयांवरून दीड लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. एवढेच नव्हे तर अशा ग्राहकांची पीओएस मर्यादा आता ५ लाख रुपये असेल, जी पूर्वी फक्त 1 लाख 25 हजार रुपये होती.
बँकेने आपल्या ग्राहकांना सांगितलं की तुम्ही तुमच्या कार्डची मर्यादा स्वत: सेट करू शकता. इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, पीएनबी एटीएम, आयव्हीआर आणि बँक शाखेत जाऊन तुम्हाला हे काम करता येणार आहे.
पीएनबीच्या ग्राहकांना सध्या एटीएममधून दररोज 25 हजार रुपये रोख रक्कम काढण्याची मर्यादा आहे, तर एकावेळी केवळ 20 हजार रुपये काढता येतात. पीओएसच्या माध्यमातून ग्राहकांना सध्या 60 हजार रुपये काढण्याची संधी दिली जाते. काही विशेष कार्डवर या मर्यादा वाढवण्यात आल्या आहेत.
याशिवाय ग्राहकांवर रोखीने पैसे काढण्याची मर्यादाही 50 हजार रुपये निश्चित करण्यात आली होती. आतापर्यंत व्हिसा गोल्ड डेबिट कार्डधारकांची दररोजची रोख रक्कम काढण्याची मर्यादा 1.25 लाख रुपये होती, आता एकावेळी फक्त 20,000 रुपये काढता येणार आहेत.