पीएम किसान योजनेचे 13 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत जमा झाले आहेत. आता प्रतीक्षा चौदावा हप्ता कधी येणार याची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणून याकडे पाहिलं जातं. त्यामुळे आता शेतकरी चौदाव्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत.
हा हप्ता जून-जुलैच्या दरम्यान येईल असं सांगितलं जात आहे. पण असे काही शेतकरी आहेत ज्यांना या हप्त्याचा लाभ मिळू शकत नाही किंवा मिळणार नाही. याआधी देखील त्यांना अडचण आलेली असू शकते. याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
ज्या शेतकऱ्यांनी अजूनही E KYC केलं नाही त्यांना या चौदाव्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही. यासाठी तुम्हाला जवळच्या केंद्रत जाऊन किंवा ऑनलाईन E KYC करणं बंधनकारक आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लवकरच 14 वा हप्ता जारी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तातडीने किसान योजनेच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही E KYC करणं बंधनकारक आहे. नाहीतर तुम्हाला हप्ता मिळणार नाही.
तुम्हाला अधिकृत पोर्टल https://pmkisan.gov.in/ ला भेट द्यावी लागेल. यानंतर, येथे दिलेल्या माजी कोपऱ्यावर क्लिक करा. त्यानंतर लाभार्थी स्थितीवर देखील क्लिक करा.
यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल. या नवीन पेजवर तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार क्रमांक आणि 10 अंकी मोबाइल क्रमांक टाकावा लागेल. मग तुम्हाला तुमची स्थिती दिसेल.
सरकारने शेतकऱ्यांसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. जर तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अर्ज केला असेल. त्याची स्थिती जाणून घेण्यासाठी तुम्ही 155261 वर कॉल करू शकता. यावर तुम्हाला सर्व प्रकारची माहिती मिळू शकते.