सलग दुसऱ्या दिवशी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. क्रूड ऑईल 80 डॉलरवर पोहोचलं आहे. त्यामुळे पुन्हा पेट्रोल डिझेल महाग झालं आहे.
सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. गौतम बुद्ध नगर (नोएडा) येथे पेट्रोल 25 पैशांनी 96.92 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 24 पैशांनी वाढून 90.08 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.
यूपीची राजधानी लखनऊमध्ये पेट्रोल 14 पैशांनी महाग झाले असून ते 96.43 रुपये प्रति लिटर झाले आहे, तर डिझेल 13 पैशांनी वाढून 89.65 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.
बिहारची राजधानी पाटणा येथे पेट्रोल 50 पैशांनी महाग होऊन 108.12 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे, तर डिझेल 47 पैशांनी वाढून 94.86 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे.
दिल्लीत पेट्रोल 96.65 रुपये आणि डिझेल 89.82 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर, चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर. कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होतो. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.