NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / तुमचा सिबिल स्कोअर कितीही खराब असेल तरी झटपट मिळणार Loan! वापरा या 10 ट्रिक्स

तुमचा सिबिल स्कोअर कितीही खराब असेल तरी झटपट मिळणार Loan! वापरा या 10 ट्रिक्स

सिबिल स्कोअर चांगला नसेल तर लोन घेण्यात अडचणी येतात असं म्हणतात पण घाबरायचं कारण नाही. तुम्ही या ट्रिकचा वापर करून लोन घेऊ शकता.

111

कोरोनामुळे अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहेत. या परिस्थितीत काही जण कर्जही घेत आहेत. तुम्हीही जर कर्ज घेण्याच्या प्रयत्नात असाल पण सिबिल स्कोअर किंवा क्रेडिट स्कोअर चांगला नसल्याने कर्ज मिळत नसेल तर त्यासाठी १० पर्याय आहेत.

211

कर्ज देणाऱ्या संस्था, बँका या सिबिल स्कोअरसह सध्याचे वेतन, उत्पन्न यांचाही विचार करते. तुमच्याकडे कमी क्रेडिट रेटिंग असेल तर तुमच्या उत्पन्नाचा, वेतनाचा पुरावा देऊन कर्ज परतफेड करण्यास सक्षम असल्याचं सिद्ध करता येतं.

311

तुम्हाला तात्काळ पैशांची गरज असताना बँकेत कर्जासाठी अर्ज न करता NBFCकडे कर्जासाठी अर्ज करणं योग्य राहील. कमी क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांनाही NBFC कर्ज देते. मात्र त्यांचे व्याजदर बँकांपेक्षा जास्त असतात.

411

सिबिल स्कोअर कमी असल्यानं कर्जपुरवठा करणाऱ्या संस्था तुम्हाला एक जोखीम असलेला ग्राहक मानतात. त्यामुळे तुमची कर्जाची रक्कम कमी असावी. तुम्ही कमी रकमेचा पर्याय निवडू शकता आणि ते नियमित भरून सिबिल स्कोअरही चांगला करता येईल.

511

तुम्हाला सिबिल स्कोअर कमी असल्यानं कर्ज मिळत नसेल तर जॉइंट कर्ज घेऊ शकता. याशिवाय तुम्ही ज्याचा सिबिल स्कोअर चांगला आहे अशा गॅरंटरच्या माध्यमातूनही कर्ज घेऊ शकता.

611

आर्थिक सेवा देणाऱ्या काही कंपन्या सॅलरी एडव्हान्सच्या स्वरुपात कर्ज देतात. त्यामध्ये तुमच्या वेतनातून अर्धी रक्कम कर्जाचा हफ्ता म्हणून कापून घेतली जाते. तुम्ही शॉर्ट टर्मसाठी असलेली पैशांची गरज यामुळे पूर्ण करू शकता. तसंच ही प्रक्रिया सोपी असून रक्कम थेट खात्यावर येते

711

सोन्यावर कर्ज हे एक सुरक्षित कर्ज आहे. यावर कागदोपत्री कामकाज खूपच कमी असतं. तसंच बँक याबाबतीत क्रेडिट स्कोअरही चेक करत नाही. यात सोन्याच्या सध्याच्या किंमतीच्या ७५ टक्के कर्ज मिळतं.

811

पोस्ट ऑफिस किंवा बँक तुम्हाला एफडीच्या बदल्यात कर्ज देऊ शकते. सर्वसामान्यपणे याचे व्याज दर एफडीवर आपल्याला मिळणाऱ्या व्याजदरा पेक्षा एक दोन टक्के जास्त असतात.

911

विमा पॉलिसीवरही कर्ज मिळू शकतं. याचे व्याज दरसुद्धा वैयक्तिक कर्जाच्या तुलनेत कमी असतात. विमा पॉलिसी बँकेच्या नावावर असाइन करावी लागते. जर तुम्ही कर्ज फेडलेत तर बँक पुन्हा विमा पॉलिसी तुमच्या नावे रिअसाइन करते.

1011

पीयर टू पीयर लँडिंगचे चलन भारतात वेगाने वाढत आहे. क्रेडिट स्कोअर चांगला नसला तरीही कर्ज घेता येतं. याचे व्याजदर जास्त असू शकतात. तसंच याशिवाय तुम्हाला सह अर्जदारासोबत कर्जासाठी अर्ज करून क्रेडिट स्कोअर चांगला नसतानाही कर्ज घेता येतं.

1111

बँकांच्या चुकीमुळेही सिबिल स्कोअर बिघडतो. यापासून वाचण्यासाठी तुम्ही दर सहा महिन्यांनी एकदा तुमचा सिबिल स्कोअर चेक करत रहा. तुमची फसवणूक झाल्यासही क्रेडिट स्कोअर कमी होऊ शकतो. त्यासाठी बँकांना संपर्क करा.

  • FIRST PUBLISHED :