तुम्ही अजूनही आधार पॅन कार्ड लिंक केलं नसेल तर तुमच्याकडे 10 दिवस शिल्लक आहे. अजूनही वेळ गेली नाही.
पॅन कार्ड 31 मार्चआधी आधार कार्डशी लिंक केलं नाही तर ते कचऱ्याच्या पेटीत फेकण्याची वेळ येईल, तुमचं पॅनकार्ड अवैध ठरवलं जाईल.
तुम्हाला आता हजार रुपये दंड भरून पॅन आधार लिंक करण्याची मुभा आहे. 1 एप्रिलनंतर मात्र पॅन आधार लिंक करण्यासाठी तुम्हाला 10 हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे आताच अलर्ट होऊन चेक करा
तुम्ही आयकर विभागाच्या वेबसाईटवर जाऊन आधार पॅन लिंक आहे की नाही ते तपासू शकता. जर नसेल तर तुम्ही आधार पॅन ऑनलाईन लिंक देखील करू शकता.
SMS च्या माध्यमातूनही तुम्ही पॅन-आधार लिंक स्टेटस चेक करु शकता. यासाठी 'UIDPAN < 12 digit Aadhaar number> < 10 digit Permanent Account Number>' या फॉर्मेटमध्ये 567678 किंवा 56161 नंबरवर मॅसेज पाठावा.