ही योजना चार वर्षांपूर्वीच सुरू झाली होती. मात्र मुंबई सोडून इतर कोणत्याच राज्यात या योजनेला हवं तसं यश मिळालं नाही. सर्वातआधी मुंबईत ही योजना सुरू कऱण्यात आली. कारण मुंबईत मोठ्या प्रमाणात प्रवासी ट्रेनने प्रवास करतात. मुंबईनंतर दिल्ली, चेन्नई यांसारख्या महानगरांमध्ये ही योजना सुरू करण्यात आली.
रेल्वेने आतापर्यंत ही योजना त्यांच्या १५ झोनमध्ये सुरू केली आहे. ही योजना लांब पल्ल्यांच्या प्रवासासाठी रेल्वेचा उपयोग करतात त्यांच्यासाठी फायदेशीर आहे.
रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अधिक माहिती देताना सांगितले की, ‘सध्या प्रवाशांनी जास्तीत जास्त यूटीएस मोबाइल अपचा वापर करावा याबद्दल रेल्वे प्रशासन प्रोत्साहित करत आहे. अनेक प्रवाशी या अपचा वापर करत आहेत. त्यामुळे येत्या काळात प्रवाशांना या अपचे फायदे कळतील आणि जास्तीत जास्त प्रवासी ऑनलाइन तिकीट घेतील.’
गेल्या चार वर्षांपासून सर्वसाधारणपणे ४५ लाख प्रवासी या अपचा उपयोग करत होते. या अपवरून दिवसाला साधारणपणे ८७ हजार तिकीटं काढले जात होती. या अपचा उपयोग करण्यासाठी प्रवाशांना रेल्वे स्थानकापासून किमान २५ ते ३० मीटर दूर असणं आवश्यक आहे. या अपवरून फक्त ४ तिकीट विकत घेता येऊ शकतात.
मोबाइलमध्ये डाउनलोड करावं लागेल UTS अप- प्रवाशांना तिकीट बुकींगसाठी एकदा रजिस्ट्रेशन आणि लॉगइन करावं लागेल. एका पीएनआरवर जास्तीत जास्त ४ प्रवासी प्रवास करू शकतात. कोणत्या स्थानकावरून कोणत्या स्थानकावर जायचं आहे ते या अपमध्ये तुम्हाला टाकावं लागेल. तिकीटाची रक्कम डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि पेटीएमवरून करावं लागेल.