अलीकडे पालक आपल्या मुलांच्या भविष्याच्या बाबतीत प्रचंड जागरूक असतात.
मुलांचं भविष्य सुरक्षित व्हावं म्हणून पालकांनी योग्य नियोजन करायला हवं.
त्यासाठी पालक योग्य म्युच्युअल फंड निवडून त्यातील SIP मध्ये गुंतवणूक करू शकतात.
तुम्ही प्रत्येक महिन्याला पैशाची बचत केली, तर तुम्ही 55 लाख रुपयांपर्यंतचा निधी जमवू शकता.
यासाठी तुम्हाला 18 वर्षे प्रत्येक महिन्याला 5 हजार रुपयांची गुंतवणूक करायला हवी.
यादरम्यान तुम्हाला साधारणपणे 15 टक्क्यांपर्यंत रिटर्न कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करायला हवेत.
तुम्ही जर याची खबरदारी घेतली तर तुम्ही 18 वर्षांनंतर अगदी आरामात 55.2 लाखांचा फंड जमा करू शकता.
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही जोखमीची असते. परंतु त्यामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.