बऱ्याचदा आपल्याला गडबड असली की पैसे काढायचे असतात. अशावेळी नेमकं ATM मध्ये गेल्यावर काहीतरी प्रॉब्लेम होतो आणि पैसे अडकतात. पण घाबरू नका. अशावेळी आपण काय करायला हवं ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
सगळ्यात पहिल्यांदा ज्या ATM मधून तुम्ही पैसे काढायचा प्रयत्न केला त्याचा नंबर आणि तिथलं लोकेशन नोट करून ठेवा. त्या बँकेच्या जवळच्या शाखेत संपर्क करा, घडलेला प्रकार सांगा
ATM मध्येच कॅश अडकल्यामुळे ग्राहकांना मोठा अडचणींचा सामना करावा लागतो. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार तुमच्या खात्यातून पैसे कापले गेले आहेत पण एटीएममधून पैसे आले नाहीत. असं घडलं तर तुमच्या बँकेच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा.
शक्य असल्यास तुम्ही तुमच्या बँकेच्या कस्टमर केअर नंबरवर फोन करून बँकेला माहिती देऊ शकता. यानंतर आठवडाभरात बँक या प्रकरणावर कारवाई करून ATM मध्ये अडकलेली रक्कम पुन्हा तुमच्या खात्यात जमा करेल.
एटीएममधून पैसे काढताना पैसे मिळत नाहीत, तर व्यवहार झालेल्याची पावती मात्र नक्की जवळ ठेवा. तो एटीएम व्यवहाराचा पुरावा म्हणून गृहित धरला जाऊ शकतो. याशिवाय मोबाइलवरही मेसेज ठेवावा. याशिवाय तुम्ही बँक स्टेटमेंटही दाखवू शकता.
हे पैसे नियमानुसार ७ दिवसांमध्ये तुमच्या खात्यावर जमा होणं आवश्यक आहे. तसं न झाल्यास दर दिवसाला बँकेला तुम्हाला अधिक १०० रुपये पेनल्टी म्हणून द्यावे लागणार आहेत. त्यामुळे ७ दिवसांत तुमच्या खात्यावर पैसे आले का हे देखील तुम्ही चेक करणं गरजेचं आहे.