पीएम किसान योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे. चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपयांची रक्कम जमा केली जाते. आतापर्यंत 13 हप्ते या योजनेचे देण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांना आता चौदाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की नवरा बायको दोघंही या योजनेचा लाभ घेऊ शकतात का?
शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये खात्यावर जमा केले जातात. या योजनेंतर्गत अनेक दावे करण्यात आले आहेत. त्यापैकी एक म्हणजे नवरा बायको दोघांनाही या योजनेचा लाभ मिळेल असं सांगितलं जातं.
तुम्हाला जर तसा मेसेज आला असेल किंवा कोणी सांगितलं तर नेमकं त्यामागचं सत्य काय आहे ते समजून घ्या.
सरकारने जारी केलेल्या सूचनेनुसार एका कुटुंबातील केवळ एकच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो. दुसऱ्या सदस्याला त्याचा लाभ घेता येणार नाही.
त्यामुळे हा मेसेज जर तुम्हाला आला असेल किंवा कोणी सांगितला तर त्यावर विश्वास ठेवू नका.