स्वस्तात घर घेण्याचं तुमचं स्वप्न असेल तर आता पूर्ण होणार आहे. मुंबईजवळ नवी मुंबईत अगदी स्वस्तात घरं उपलब्ध आहेत.
तुम्हाला अवघ्या 17 लाखांमध्ये 1 BHK प्लॅन घेता येणार आहे. म्हाडाने याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
सगळी घरं अल्प उत्पन्न गटासाठी आहेत. तुम्हाला रजिस्ट्रेशन करून तुम्हाला 20590 रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे.
म्हाडा कोकण लॉटरी अंतर्गत गुडविल युनीटी सानपाडा नवी मुंबई प्रकल्पात ही घरं आहेत.
पुढच्या लॉटरीसाठी म्हाडाकडून कोकण मंडळाकडून ठाणे, वसई, विरार, पालघर, नवी मुंबई आणि रायगडमध्ये घरं उपलब्ध असतील.
मुंबईसाठी म्हाडाकडून गोरेगाव पहाडी भागातील घरांची लॉटरी निघणार आहे. त्यामुळे तुम्ही अजूनही पैशांची जमाजमव केली नसेल तर करायला सुरुवात करा. कारण एवढ्या स्वस्त दरात तुम्हाला कुठेही घरं मिळू शकणार नाहीत.
सानपाड इथे 1 BHK साधारण 17 लाख तर घणसोली परिसरात 2 BHK 24 लाखांपर्यंत जातो. तुम्ही म्हाडाच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता.