NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / Mhada Lottery : मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी स्वप्नातलं घर घेण्याची संधी!

Mhada Lottery : मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी स्वप्नातलं घर घेण्याची संधी!

अखेर २५ वर्षांच्या लढाईनंतर हा भूखंड म्हाडाच्या ताब्यात आला आहे. त्यामुळे आता लवकर म्हाडा या घरांबाबत लॉटरी काढण्याची शक्यता आहे.

15

तुमच्या स्वप्नातील घर घेण्याची संधी आता पुन्हा एकदा मिळणार आहे. मोक्याच्या ठिकाणी तुमच्या स्वप्नातील घर घेता येणार आहे. कारण गोरेगाव इथे म्हाडाकडून लवकरच लॉटरी निघण्याची शक्यता आहे.

25

25 वर्षांनंतर अखेर पहाडी गोरेगावचा भूखंड म्हाडाच्या ताब्यात आला. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून पहिल्या टप्प्यात ३ हजार १५ घरे बांधली जात असून यात पहिल्यांदाच ३५ मजली इमारतीचा समावेश आहे.

35

भविष्यात दुसऱ्या टप्प्यात येथे आणखी दोन ३५ मजली इमारतीसह न्यायालयीन कर्मचाऱ्यांसाठी २७ मजली इमारत प्रस्तावित आहे.

45

३५ मजली इमारतीत मध्यम गटासाठी ७०० तर, २७ मजली इमारतीत १२९ घरे असणार आहेत. पहाडी गोरेगाव येथील म्हाडाच्या मालकीच्या भूखंडांवर दुसऱ्या कोण्या व्यक्तीने मालकी हक्क दाखविल्याने हा भूखंड न्यायालयीन वादात अडकला होता.

55

अखेर २५ वर्षांच्या लढाईनंतर हा भूखंड म्हाडाच्या ताब्यात आला आहे. येत्या काळात इथे म्हाडा गोरेगावमधील घरांसाठी लॉटरी काढू शकते. त्यामध्ये अत्यंत सुंदर आणि सुखसोई सुविधा देखील देण्यात येणार आहेत.

  • FIRST PUBLISHED :