तुमच्याकडे गॅस सिलिंडर असेल तर तुम्हाला ही गोष्ट माहिती असायलाच हवी. गॅस सिलिंडरमुळे स्फोट झाला तर तुम्ही विम्यासाठी अर्ज करू शकता. हा अर्ज कुठे करायचा आणि हा क्लेम कसा मिळवायचा याबद्दल आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत.
अपघातातील जखमींना विमा भरपाई कशी मिळेल? तुम्ही तेल कंपनीकडून नुकसान भरपाईचा दावा करू शकता का? जाणून घ्या
जर काही कारणांमुळे सिलिंडरचा स्फोट झाला तर त्यावर तुम्हाला 40 ते 50 लाख रुपयांचे अपघाती कव्हर मिळतो. एलपीजी कनेक्शन घेतल्यावर पेट्रोलियम कंपन्या ग्राहकाला वैयक्तिक अपघात संरक्षण देतात.
एलपीजी सिलेंडरमधून गॅस गळती किंवा स्फोट झाल्यास आर्थिक मदत दिली जाते. या विम्यासाठी पेट्रोलियम कंपन्यांची विमा कंपन्यांशी भागीदारी आहे.
यामध्ये सिलिंडरच्या स्फोटामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास तुम्ही 50 लाख रुपयांपर्यंत दावा करू शकता. या अपघातात ग्राहकाच्या मालमत्तेचे/घराचे नुकसान झाल्यास, प्रत्येक अपघातासाठी 2 लाख रुपयांपर्यंतचा विम्यासाठी दावा करता येतो.
ज्याच्या नावावर सिलिंडर आहे त्यालाच विम्याची रक्कम मिळेल, अशी अट आहे. यामध्ये नॉमिनी करण्याची तरतूद नाही.
गॅस सिलिंडर घेण्यासाठी जाताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी. तुमचा विमा संरक्षित आहे की नाही, गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट तपासा.
तुम्ही नेहमी एक्सपायरी डेट पाहिल्यानंतरच सिलेंडर घ्या, कारण ते इन्शुरन्स सिलेंडरच्या एक्सपायरी डेटशी जोडलेले असते. दाव्याचा लाभ फक्त अशा लोकांनाच मिळेल, ज्यांचे सिलेंडर पाईप, गॅस स्टोव्ह आणि रेग्युलेटर ISI मार्कचे आहेत.