कोरोनाममुळे गेल्या काही महिन्यांपासून,आपण घरात अडकून पडलो आहोत. अशा परिस्थितीत कुठे फिरायला जायचा विचार करत असाल पण, बजेटमुळे शक्य होत नसेल तर, काही पर्यटन कंपन्यांनी विशेष ऑफर सुरू केल्या आहेत. त्या तुमच्याही फायद्याच्या ठरू शकतात. थॉमस कुक इंडिया आणि एसओटीसी ट्रॅव्हलने लोकांना आकर्षित करण्यासाठी 'हॉलिडे फर्स्ट,पे व्हेन यू रिटर्न' ही योजना सुरू केली आहे. यानुसार फिरून परत आल्यानंतर पैसे देऊ शकता. यासाठी थॉमस कुकने एनबीएफसी कंपनीशी करार केली आहे.
यासाठी आधी थॉमस कुक किंवा एसओटीसी ट्रॅव्हलच एक पॅकेज निवडावं लागेल आणि त्यानंतर नॉन-बँकिंग फायनान्स कंपनीकडे (एनबीएफसी) अर्ज करावा लागेल.
ग्राहकांची पात्रता पाहून त्यांना कर्ज देण्याचा निर्णय घेतला जाईल. एसओटीसी ट्रॅव्हलच्या मते,ग्राहकांना त्यांच्या कर्जाची परतफेड करण्याच्या क्षमतेनुसार 10 हजार ते 10 लाख रुपयांची कर्ज मंजूर कलं जाऊ शकतं.
नोकरी करणाऱ्यांकडून पॅन,आधार,3 महिन्यांचं बँक स्टेटमेंट,पेमेन्ट स्लिप किंवा व्यवसायिकांकडून 2 वर्षांचं आयकर रिटर्न मागितलं जाईल. प्रवासातून परतल्यानंतर मासिक हप्ता किंवा ईएमआय पुढील महिन्याच्या पाचव्या दिवसापासून सुरू होणार.
पण, त्या तारखेपूर्वी संपूर्ण रक्कम भरल्यास कोणतंही व्याज द्यावं लागणार नाही. इन्टॉलमेन्ट 3, 6, 9 किंवा 12 महिन्यांसाठी ठेवता येतं. दरमहा व्याज दर 1 टक्के असेल. 3 महिन्यांसाठी 3 टक्के आणि 6 महिन्यांसाठी 6 टक्के असणार.
वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा प्रवासासाठी कर्ज घेणं कधीच चांगलं नसतं. आर्थिक तज्ज्ञांच्या मते शिक्षण आणि गृह कर्ज घेणं चांगलं कर्ज मानलं जातं.
पण, फिरण्यासाठी कर्ज घ्यावं लागत असेल तर, याचा अर्थ आपली आर्थिक स्थिती अजिबात चांगली नाही असं समजावं. फाइनान्शियल प्लॅनर संकेत यादव सांगतात फिरण्याचा प्लॅन असेल तर, एक वर्षासाठी रेकरिंग डिपॉजिट किंवा सिप सुरु करा. वैयक्तिक कर्जापेक्षा ही योजना स्वस्त असेल तरच जोखीम घ्या.
बँक बाजारचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदिल शेट्टी सांगतात की, कर्जाचा कालावधी,व्याज दर यांची संपूर्ण माहिती घ्या. मग,त्याची तुलना वैयक्तिक कर्ज किंवा क्रेडिट कार्डशी करा. स्वस्त असेल तरच रिस्क घ्या.
वैयक्तिक कर्जावरील व्याज दर 8.95 टक्के पासून 20 टक्क्यांपर्यंत असू शकतं. तर, क्रेडिट कार्डचं मंथली इन्टॉलमेन्ट वैयक्तिक कर्जापेक्षा लवकर परतफेड करता येतं. परंतु त्यावरचं व्याज दर जास्त आहे.