NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / दरमहा 42 रुपये गुंतवून मिळवा आयुष्यभर पेन्शन, ही सरकारी योजना ठरतेय अनेकांच्या फायद्याची

दरमहा 42 रुपये गुंतवून मिळवा आयुष्यभर पेन्शन, ही सरकारी योजना ठरतेय अनेकांच्या फायद्याची

अनेकांचे भविष्य सुरक्षित करण्यामध्ये मोदी सरकारच्या (Modi Government) या योजनेने हातभार लावला आहे. तुम्ही देखील या योजनेत खातं उघडू शकता, वाचा सविस्तर

16

अटल पेन्शन योजना-अटल पेन्शन योजना केंद्र सरकारची एक सोशल सिक्योरिटी स्कीम आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार असंगठित क्षेत्रांमध्ये (Unorganized Sector) काम करणाऱ्या लोकांना 1 ते 5 हजार रुपयांपर्यंत पेन्शन देते. 18 ते 40 वयोगटातील कोणतीही व्यक्ती अटल पेन्शन योजना खाते (APY Account) उघडू शकते. या सरकारी योजनेतील विशेष बाब म्हणजे तुम्ही जितक्या लवकर गंतवणूक कराल तेवढा जास्त फंड तुम्हाला मिळेल.

26

अटल पेन्शन योजनेमधील सदस्यांची संख्या ऑगस्ट 202 पर्यंत 2.4 कोटींपेक्षा जास्त झाली आहे. आर्थिक वर्ष 2020-21 दरम्यान 260 APY प्रोव्हायडर्सच्या माध्यमातून 17 लाखांपेक्षा जास्त APY खाती उघडण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार याआधारे खातेधारकांची संख्या यावर्षी ऑक्टोबरपर्यंत 34.51 टक्क्यांनी वाढून 2.45 कोटींवर गेली आहे, जी गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये 1.82 कोटी होती.

36

अटल पेन्शन योजनेअंतर्गत मृत्यूनंतरही तुमच्या कुटुंबाला मदत मिळेल. तुम्ही केवळ 42 रुपयांपासून गुंतवणुकीस सुरुवात करू शकता. याकरता एखाद्या व्यक्तीस वयाच्या 18 व्या वर्षापासून गुंतवणूक करणे गरजेचं आहे. या वयापासून तुम्ही दरमहा 42 रुपये गुंतवणूक केली तर वयाच्या 60 व्या वर्षापासून तुम्हाला 1000 रुपये पेन्शन मिळेल. तर 18 व्या वर्षापासून तुम्ही दरमहा 210 रुपये या योजनेत जमा केले तर तुमची पेन्शन प्रति महिना 5 हजार होईल.

46

मृत्यूनंतरही मिळतो योजनेचा फायदा- जर वयाची 60 वर्ष पूर्ण होण्याआधीच या योजनेच्या लाभार्थ्याचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीचा पार्टनर (पती किंवा पत्नी) या योजनेत पैसे भरण्यास सुरू ठेवू शकतो. किंवा या व्यक्तीचा पती किंवा पत्नी ती रक्कम एकरकमी मिळावी याकरता दावा देखील करू शकतात. दोघांचाही मृत्यू झाल्यास ही रक्कम नॉमिनीला दिली जाते.

56

पेंशन नियामक पेंशन फंड रेग्युलेटरी अँड डेवलपमेंट अथॉरिटी (PFRDA) च्या मते, सार्वजनिक क्षेत्रातील श्रेणीअंतर्गत चालू आर्थिक वर्षात सर्वात जास्त APY खाती SBI मध्ये उघडण्यात आली आहेत. खाजगी क्षेत्रात सर्वाधिक खाती अॅक्सिस बँकने, आरआरबीमध्ये आर्यावृत बँकेने (Aryavart Bank) तर पेमेंट बँकांमध्ये एअरटेल पेमेंट बँकेने सर्वाधिक खाती उघडली आहेत.

66

कुठे उघडाल या योजनेसाठी खाते?- कोणत्याही सरकारी किंवा खाजगी बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये या योजनेसाठी खाते उघडता येईल. एका व्यक्तीला एकच अटल पेन्शन योजना खाते उघडण्याची मुभा आहे. या योजनेमध्ये पेन्शनरच्या मृत्यूनंतर पती/पत्नी याचा लाभ घेऊ शकतात अशी सुविधा आहे. मुलांना देखील या योजनेचा लाभ मिळू शकतो. विशेष म्हणजे इनकम टॅक्स कायदा (Income Tax Act.) सेक्शन 80C अंतर्गत या या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर टॅक्समध्ये सूट देखील मिळेल. अटल पेंशन योजनेबाबत (APY) अधिक माहितीसाठी तुम्ही या वेबसाइटवर जाऊ शकता-https://npscra.nsdl.co.in/nsdl/scheme-details/APY_Scheme_Details.pdf

  • FIRST PUBLISHED :