NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / MNC मधील नोकरी सोडून पठ्ठ्याने सुरू केली स्ट्रॉबेरीची शेती, आज काढतोय लाखोंचं उत्पन्न

MNC मधील नोकरी सोडून पठ्ठ्याने सुरू केली स्ट्रॉबेरीची शेती, आज काढतोय लाखोंचं उत्पन्न

MNC मधील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून गावी आला, आज कमावतोय लाखो रुपये

111

शक्ती सिंह प्रतिनिधी कोटा : स्ट्रॉबेरीसाठी हवामान थंड लागतं मात्र राजस्थानच्या कोटा इथे एका तरुणानं स्ट्रॉबेरी पिकवली. नुसती पिकवली नाही तर त्यामधून भरपूर उत्पन्नही त्याने मिळवलं आहे.

211

नोकरीसोडून शेतीत काहीतरी वेगळा प्रयोग करण्याची जोखीम दाम्पत्याने स्वीकारलं आणि शेतीतून सोनं केलं. स्ट्रॉबेरीच्या लागवडीत कमी वेळात चांगला नफा मिळत असल्याचे कपिल जैन यांनी सांगितलं.

311

मध्य प्रदेशातील नीमच येथून स्ट्रॉबेरीची रोपे आणली होती. पहिल्या वर्षी स्ट्रॉबेरीमध्ये ₹3 लाखांचा नफाही मिळाला. एक बिघा जमिनीमध्ये त्यांनी 12000 स्ट्रॉबेरीची रोपे लावली. त्यांची व्यवस्थित काळजी घेतली.

411

स्ट्रॉबेरीच्या लागवडीतील खाचखळगे विशेष माहिती नसल्याने सुरुवातीच्या वर्षात फार नफा मिळवता आला नाही. मात्र त्यांनी हार मानली नाही. पुन्हा एकदा नव्या जोमाने तयारी केली आणि यावर्षी उत्तम नफा मिळवला.

511

आजच्या घडीला कपिल आणि त्यांच्या बायकोने गावातील लोकांनाही चांगला रोजगार मिळवून दिला आहे. या दोघांची कोटामध्ये सध्या चर्चा होत आहे.

611

शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांबरोबरच बागायती पिकांकडे लक्ष दिल्यास चांगला नफा मिळू शकतो असं कपिल सांगतात.

711

बागायती पिकांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना बाजारात चांगला भाव मिळतो.

811

आंबा, डाळिंब, केळी, नाशपाती याबरोबरच स्ट्रॉबेरीची लागवड शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहे.पिकांच्या लागवडीसाठी शासनाकडूनही मदत दिली जाते

911

या स्ट्रॉबेरीला व्यवस्थिती पॅकिंग करून ते विकतात. त्यातून त्यांना मोठा फायदा मिळतो. यामुळे गावात रोजगारही निर्माण झाले आहेत.

1011

फक्त त्यासाठी तुम्हाला योग्य माहिती काढता आली पाहिजे.

1111

बाजारात या फळाचा भाव चांगला आहे. त्याची योग्य पद्धतीने लागवड केल्यास त्यातून चांगला नफा मिळू शकतो.

  • FIRST PUBLISHED :