मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाला बँकेत खातं उघडता यावं यासाठी काही जनधन योजना उपक्रम राबवला. या मोहिमेंतर्गत प्रत्येक गोरगरीब आणि गरजूला बँकेत झीरो बॅलन्स खातं उघडता यावं यासाठी मोदी सरकारने प्रयत्न सुरू केले. या खात्यावर अनेक ग्राहकांना मोठे लाभ मिळतात. शिवाय सेव्हिंग अकाउंटमधील रक्कमही घरबसल्या चेक करता येते.
तुमचं जर खातं खासगी बँकेत असेल तर ते जनधन योजनेत कनव्हर्ट करून घेता येतं. शिवाय त्यावर मिळणारे फायदे अनेक आहेत. तुमचं या बँकेत खातं असेल तर तुम्ही घरबसल्या कसा बॅलन्स चेक करू शकता जाणून घ्या.
या बँकेत तुमचं जनधन खातं असेल तर तुम्हाला 18004253800 आणि 1800112211 कस्टमर केअर नंबरवर मिस्ड कॉल द्यावा लागेल. तुमची भाषा निवडा आणि तुम्हाला तुमचा बॅलन्स आणि शेवटचे 5 व्यवहार जाणून घ्यायचे असतील तर 1 दाबा. याशिवाय स्टेट बँकेचे ग्राहक नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 92237 66666 या क्रमांकावर फोन करून बॅलन्स तपासू शकतात.
स्टेट बँकेव्यतिरिक्त तुमचं खातं पंजाब नॅशनल बँकेत असेल तर त्यासाठी तुम्ही एका नंबरवर मिस्ड कॉल देऊनही बॅलन्स किती ते पाहू शकता. तुम्हाला रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 18001802223 किंवा 01202303090 मिस्ड कॉल द्यायचा आहे. या नंबरवर SMS करूनही बॅलन्सची माहिती घेता येते.
आयसीआयसीआयमध्ये असेल तर कसा बॅलन्स चेक करायचा जाणून घ्या. तुमची बँक बॅलन्स जाणून घेण्यासाठी तुम्हाला 9594612612 मिस्ड कॉल द्यावा लागेल. याशिवाय आयसीआयसीआय बँकेचे ग्राहक आयबीएल लिहून 9215676766 मेसेज पाठवून आपला बॅलन्स चेक करू शकता.
अॅक्सिस बँकेचे ग्राहक त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 18004195959 फोन करून खात्याचा बॅलन्स तपासू शकतात. त्याचबरोबर मिनी स्टेटमेंटसाठी तुम्ही 18004196969 क्रमांकावर कॉल करून मागवू शकता.
जर तुमचं जनधन खातं बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर इथे तुम्ही तुमची मिनिमम बॅलन्स सहज चेक करू शकता. यासाठी तुम्हाला 09015135135 मिस्ड कॉल द्यावा लागेल आणि इथे मिस्ड कॉल देऊन तुम्ही तुमचा बॅलन्स तपासू शकता.
अॅक्सिस बँकेचे ग्राहक त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 18004195959 फोन करून खात्याचा बॅलन्स तपासू शकतात. त्याचबरोबर मिनी स्टेटमेंटसाठी तुम्ही 18004196969 क्रमांकावर कॉल करून मागवू शकता.