कामानिमित्त बाहेरगावी राहणाऱ्यांसाठी किंवा ज्यांना फेस्टिव्ह सीझनमध्ये फिरायचं आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. दिवाळी किंवा छठ पूजेनिमित्त कुठे जाण्याचा विचार करत असाल तर IndiGo दिवाळी ऑफर 2021 अंतर्गत तिकीट बुकिंगवर तुम्हाला 10% ते 50% पर्यंत सवलती मिळतील. याशिवाय इतरही अनेक ऑफर्स देण्यात येत आहेत.
सशस्त्र दल आणि लस घेतलेल्या प्रवाशांसाठी सवलत: इंडिगो सशस्त्र दलांच्या बाबतीत मूळ भाड्यावर 50% पर्यंत सूट देत आहे. त्याचबरोबर लसीकरण झालेल्या प्रवाशांना 10 टक्क्यांपर्यंत सवलत देत आहे..
विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ऑफर: IndiGo विद्यार्थ्यांना मूळ भाड्यावर सवलतीसह अतिरिक्त 10 किलो सामान भत्ता देत आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत, एअरलाइन्स मूळ भाड्यात 6 टक्के सूट मिळणार आहे
कॅशबॅक आणि क्रेडिट कार्ड ऑफर: इंडिगोने प्रवास करणाऱ्यांसाटी HSBC क्रेडिट कार्डवर 5 टक्के कॅशबॅक उपलब्ध आहे. तसेच, इंडसइंड बँक क्रेडिट कार्डधारकांना 12 टक्के कॅशबॅक दिला जात आहे.
कसे बुक कराल तिकिट?- ग्राहक इंडिगोच्या अधिकृत वेबसाइट goindigo.in वर लॉग इन करून त्यांची फ्लाइट बुक करू शकतात.