NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / Indian Railways: भारतीय रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय, 150 वर्ष जुनी परंपरा बदलणार

Indian Railways: भारतीय रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय, 150 वर्ष जुनी परंपरा बदलणार

Indian Railways: या निर्णयाचं काही लोक स्वागत देखील करत आहेत. सध्या हा निर्णय प्रायोगिक तत्वावर घेण्यात आला आहे.

18

भारतीय रेल्वेने एक मोठं पाऊल उचललं आहे. दीडशे वर्ष जुनी गोष्ट परंपरा आता मोडणार अशी चर्चा सुरू झाली आहे. पण या निर्णयाचं काही लोक स्वागत देखील करत आहेत. सध्या हा निर्णय प्रायोगिक तत्वावर घेण्यात आला आहे.

28

आज जेव्हा जेव्हा तुम्ही देशातील कोणत्याही रेल्वे स्थानकाजवळ जाता तेव्हा तुम्हाला अनाउन्समेंचा आवाज ऐकू येतो. 'प्रवाशांनो कृपया लक्ष द्या' आणि मग तुम्हाला जाणाऱ्या ट्रेनची माहिती मिळते. मात्र चेन्नईमध्ये ही अनाउन्समेंट आता होणार नाही.

38

चेन्नई रेल्वे स्थानकात पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम ही पद्धत रद्द करण्यात आली आहे. हे डॉ. एमजीआर रामचंद्रन सेंट्रल रेल्वे स्टेशन आहे, ज्याला चेन्नई सेंट्रल असेही म्हणतात. दीडशे वर्षे जुन्या या स्थानकावरील लाऊडस्पीकर रविवारपासून बंद आहेत.

48

याच निर्णयामुळे या स्टेशनला शांत स्टेशनचा दर्जा मिळाला आहे. प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी त्यांनी स्टेशनवर मोठे LED बोर्ड देखील लावले आहेत.

58

या बोर्डवर प्रवाशांना ट्रेनच्या वेळा आणि त्याची संपूर्ण माहिती मिळणार आहे. त्यामुळे या निर्णयाचं काही नागरिकांनी स्वागत केलं आहे. तर काही जणांनी या निर्णयाला ट्विट करून विरोधही दर्शवला आहे.

68

चेन्नईमध्ये लोकल ट्रेनसाठी मात्र नियमित अनाउन्समेंट केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. बाहेरगावी जाणाऱ्या ट्रेनसाठी मात्र ही अनाउन्समेंट होणार नाही.

78

रेल्वेच्या या निर्णयामुळे नागरिकांना त्रास होत आहे. याचं कारण म्हणजे अनाउन्समेंटचा आवाज हा दूरपर्यंत जातो. त्यामुळे ट्रेनची माहिती मिळते.

88

प्रत्येकाला वाचता येतच असं नाही त्यामुळे अशिक्षित लोकांसमोर वाचायचं कसं हा प्रश्नही आहे. त्यामुळे ही अडचण कशी सुटणार हा प्रश्न आहे.

  • FIRST PUBLISHED :