NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / या सरकारी बँकांकडून ग्राहकांसाठी खूशखबर! आता प्रत्येक महिन्याला होणार EMIवर बचत

या सरकारी बँकांकडून ग्राहकांसाठी खूशखबर! आता प्रत्येक महिन्याला होणार EMIवर बचत

देशातील तीन मोठ्या सरकारी बँकानी (PSU Bank) त्यांच्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी कर्जावरील व्याजदर घटवण्याचा निर्णय घेतला आहे.

14

सरकारी बँका असणाऱ्या युनियन बँक ऑफ इंडिया, युको बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँक यांनी त्यांच्या ग्राहकांना दिलासा दिला आहे. बँकेचे नवीन दर आजपासून लागू होत आहेत.

24

युनियन बँक ऑफ इंडियाने कर्जावरील प्रमुख व्याजदर (एमसीएलआर) मध्ये 0.05 टक्के कपात केली आहे. बँकेच्या मते एक वर्ष कालावधीच्या कर्जासाठी MCLR 7.25 टक्क्यांवरून 7.20 करण्यात आला आहे. अशाप्रकारे एक दिवस आणि एका महिन्याच्या अवधीसाठी असणारे कर्जाचे व्याजदर 6.75 टक्के आहेत

34

इंडियन ओव्हरसीज बँक (IOB-Indian Overseas Bank) ने देखील एमसीएलआर दरात 0.10 टक्के कपात केली आहे. बँकेने एक वर्षाच्या कालावधीसाठी असणाऱ्या कर्जावरील व्याजदर 7.65 टक्क्यावरून 7.55 टक्के केले आहे. गुरुवारपासून हे दर लागू झाले आहेत.

44

युको बँकेने एमसीएलआरमध्ये 0.05 टक्के कपात केली आहे. बँकेने एका स्टेटमेंटमध्ये असे म्हटले आहे की, एक वर्ष कालावधीच्या कर्जासाठी व्याजदर 7.40 टक्क्यावरून 7.35 टक्के करण्यात आले आहेत. ही कपात अन्य सर्व कालावधीच्या कर्जासाठी समान पद्धतीने लागू होईल.

  • FIRST PUBLISHED :