मुंबई : तुमच्याकडे आहे का पॅनकार्ड मग आयकर विभागाने दिलेल्या अलर्टकडे दुर्लक्ष करू नका. याचं कारण म्हणजे तुम्ही दुर्लक्ष केलं तर अडचणीत येऊ शकता. पॅनकार्ड सर्वात महत्त्वाचा भाग आहे. बँकेत आयकर भरताना पॅनकार्ड आवश्यक आहे. त्यामुळे पॅनकार्ड होल्डर्ससाठी ही बातमी महत्त्वाची आहे.
तुम्ही अजूनही तुमचं पॅनकार्ड जर आधारशी लिंक केलं नसेल तर तातडीने ते करा. आयकर विभागाने याबाबत अलर्ट दिला आहे. 1 एप्रिल 2023 आधी तुम्ही आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करणं आवश्यक आहे.
आयकर विभाग वारंवार आपल्या वेबसाईट तसेच सर्व सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची आठवण करून देत आहे.
जर तुम्ही अजूनही पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केलं नसेल तर तुमच्याकडे 31 मार्च 2023 पर्यंतची मुदत आहे. जर तुम्ही लिंक केलं नाही तर 31 मार्चनंतर म्हणजेच 1 एप्रिलपासून तुमचं पॅनकार्ड बंद होणार आहे. त्याचा काही उपयोग होणार नाही.
तुम्ही तुमचं आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक केलं असेल तर तुम्हाला 1000 रुपये शुल्क द्यावं लागेल. एवढंच नाही तर जर तुम्ही 31 मार्च 2023 पर्यंत तुमचं आधार आणि पॅन लिंक केलं नाही तर तुमचं पॅन कार्ड निष्क्रिय होईल.
पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2022 आहे. 31 मार्च 2022 नंतर आणि 30 जून 2022 पूर्वी पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी 500 रुपये शुल्क निश्चित करण्यात आलं होतं.
एवढेच नव्हे तर 30 जून 2022 नंतर पॅन आणि आधार लिंक करण्याचे शुल्क 500 रुपयांवरून 1000 रुपये करण्यात आले.