मुंबई, 07 जुलै: भारतीय स्टार्टअप्सनी (Indian Start-ups) यावर्षी पहिल्या सहा महिन्यात व्हेंचर कॅपिटलिस्ट आणि प्रायव्हेट इक्विटी फर्म्समधून 12.1 बिलियन डॉलर मिळवले आहेत.
गेल्या कॅलेंडर वर्षातील एकूण फंडिंगपेक्षा ही फंडिंग 1 बिलियन डॉलर्सनी जास्त आहे. ही बाब व्हेंचर इंटेलिजेन्स द्वारा ईटीशी शेअर केलेल्या माहितीमध्ये समोर आली आहे.
सातत्याने फंड्स वाढत असल्याने अर्थात फंड्सचा फ्लो वाढत असल्याने रेकॉर्ड लेव्हलवर स्टार्टअप्स यूनिकॉर्न क्लबमध्ये बदलले आहेत. त्या खाजगी स्टार्टअप कंपनीला यूनिकॉर्न म्हणतात ज्याचे मुल्य 1 अब्ज डॉलर असते.
व्हेंचर कॅपिटलिस्ट्स, एंटरप्रेन्योर आणि इंडस्ट्री इनसायडरने अशी माहिती दिली आहे की, कोरोनो पँडेमिकनंतर व्यवसायात डिजिटल तंत्रज्ञान आत्मसात केल्यामुळे तरुण आणि विकसीत स्टार्टअप्सना जास्त फंडिंग मिळते आहे. आकडेवारीवरून अशी माहिती मिळते आहे की गेल्या सहा महिन्यामध्ये 100 मिलियन डॉलरपेक्षा अधिक फंडिंग राउंड होते.
जानेवारी ते जून या कालावधीमध्ये फंडिग वाढवण्यामध्ये प्रामुख्याने एज्युकेशन टेक्नोलॉजी कंपनी बायजूस (Byju) (1 बिलियन डॉलर), फूड डिलीव्हरी प्लॅटफॉर्म स्विगी (800 मिलियन डॉलर), झोमॅटो (576 मिलियन डॉलर), क्षेत्रीय भाषा सोशल मीडिया अॅप शेअरचॅट 502 मिलियन डॉलर आणि गेमिंग स्टार्टअप ड्रीम11 (400 मिलियन डॉलर) यांचा समावेश आहे.