NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / जबरदस्त! UPI payment साठी आता नेटची गरज नाही, पाहा कसं करायचं

जबरदस्त! UPI payment साठी आता नेटची गरज नाही, पाहा कसं करायचं

कोरोनानंतर ऑनलाइन किंवा यूपीआय पेमेंटचा वापर जास्त करायला लागले आहेत. त्यामुळे तुम्हाला ही ट्रिक खूप जास्त कामी येऊ शकते.

15

यूपीआय वापरताना बऱ्याचदा असं होतं की इंटरनेट स्लो असतं किंवा रेंजचा प्रॉब्लेम असतो. पण आता टेन्शन नाही, कारण इंटरनेटशिवाय यूपीआय पेमेंट करता येणार आहे. कोरोनानंतर ऑनलाइन किंवा यूपीआय पेमेंटचा वापर जास्त करायला लागले आहेत. त्यामुळे तुम्हाला ही ट्रिक खूप जास्त कामी येऊ शकते.

25

तुम्ही तुमचं अकाउंट आधी गुगल पे, फोन-पे किंवा पेटीएम किंवा भीमसारख्या यूपीआय अॅपशी लिंक केलं असेल, तरच तुम्ही ते वापरू शकता. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने '*99# सेवा सुरू केली. ही सेवा नेमकी काय आहे जाणून घेऊया.

35

यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या रजिस्टर्ड स्मार्टफोनच्या डायल पॅडवर *99# डायल करायचं आहे. एक मेनू आपल्या बँक सुविधेबद्दल पॉप-अप करेल. यात पैसे पाठवा, रिक्वेस्ट मनी, चेक बॅलन्स, यूपीआय पिन असे पर्याय मिळतील.

45

मग तुम्ही निवडलेल्या पर्यायाचा नंबर टाइप करून पाठवा. यानंतर तुम्हाला लाभार्थ्याची माहिती द्यावी लागेल. आपण पेमेंट टिप्पणी देखील देऊ शकता. व्यवहार पूर्ण करण्यासाठी आपण आपला यूपीआय पिन अपलोड करा.

55

यूपीआय पिन अपलोड केल्यानंतर व्यवहार पूर्ण होईल. लाभार्थ्याला पैसे पाठवले जातील. तुम्ही ही सेवा डिसेबल देखील करू शकता. त्यासाठी पुन्हा तुम्हाला रजिस्टर्ड फोन नंबरवरून *99# डायल करावं लागेल.

  • FIRST PUBLISHED :