गरमीच्या दिवसात लोक एसीचा वापर खूप जास्त करतात. मुंबईसारख्या शहरात तर 12 महिने एसीची आवश्यकता असते.
जेवढा जास्त वेळ तुम्ही एसी चालू ठेवता, तेवढं तुमचं लाईटबील सुद्धा जास्त येतं.
परंतु तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली, तर एसीसाठी लागणारी वीज वाचवू शकता. त्यामुळं तुमचं वीजबिल सुद्धा कमी येईल.
चला जाणून घेऊया ते मार्ग कोणते आहेत.
एसी खरेदी करतेवेळी 5 स्टार रेटींग असलेला एसी खरेदी करा.
ऑटो कट एसी खरेदी करण्याला प्राधान्य द्या. हे एसी तुमची रुम थंड झाल्यावर आपोआप बंद होतात.
एसीला 16 नाही तर 24 डिग्री तापमानावर चालवायला हवा.
झोपतेवेळी एसीला टायमर जरूर लावायला हवा, जेणेकरून तो आपोआप बंद होईल.
एसी चालू असताना खिडक्या-दारं बंद कराव्यात.
एसीची वेळोवेळी देखभाल अथवा दुरुस्ती करा.