मुंबई : तुम्ही अजूनही तुमच्या बँक खात्याला पॅनकार्ड लिंक केलं नाही का? तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. SBI ने आपल्या ग्राहकांसाठी सोप्या पद्धतीने पॅनकार्ड कसं लिंक करायचं ते सांगितलं आहे. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पॅनकार्ड तुमच्या खात्याला लिंक करू शकता. त्यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप फॉवो करायच्या आहेत.
तुम्हाला SBI इंटरनेट बँकिंग सुविधा सुरू करावी लागेल. onlinesbi.sbi पोर्टलवर क्लीक करा. तुमच्यासमोर वेबपेज सुरू होईल. तिथे तुम्हाला अकाउंट आणि प्रोफाइल सेक्शनमध्ये जायचं आहे. प्रोफाइल पर्याय निवडा. तिथे e-Service सेक्शनमध्ये जाऊन तुम्हाला PAN Registration पर्याय निवडायचा आहे.
तुम्हाला SBI प्रोफाइल पासवर्ड विचारला जाईल. तो पासवर्ड अपलोड करा. सबमिट केल्यावर तुमच्यासमोर पुढचं पेज सुरू होईल. CIF आणि पॅन नंबर जर लिंक असेल तर तिथे तुम्हाला दिसेल. नसेल तर तिथे रजिस्टर करण्याचा पर्याय निवडा.
तुमचा पॅन नंबर अपलोड करा आणि सब्मिट करा. तिथे तुम्हाला CIF आणि पॅन नंबर लिंक झालेला दिसेल. प्लीज कंन्फर्म पर्याय निवडा. तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक OTP मिळेल. तो OTP तुम्ही अपलोड करा. कन्फर्म करा त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेजवर एक मेसेज दिसेल.
7 वर्किंग डेमध्ये तुमची रिक्वेस्ट पूर्ण होईल. तुमच्या बँक खात्याला पॅन नंबर जोडलेला दिसणार आहे. जर तुमचं इंटरनेट बँकिंगच नसेल तर मात्र तुम्ही जवळच्या शाळेत जाऊन अर्ज भरून लिंक करू शकता. त्यासोबत तुम्ही इंटरनेट बँकिंगची सुविधा देखील सुरू करू शकता.