NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / सणासुदीमुळे आर्थिक बजेट बिघडलं? काळजी नको, गाडी रुळावर आणण्याचा हा आहे प्रभावी मार्ग

सणासुदीमुळे आर्थिक बजेट बिघडलं? काळजी नको, गाडी रुळावर आणण्याचा हा आहे प्रभावी मार्ग

तब्बल 2 वर्षांनंतर या सणासुदीत लोकांनी मोठी खरेदी केली. कोविड-19 चा प्रादुर्भाव कमी होण्यासोबतच व्यावसायिक घडामोडींमध्येही तेजी आली आणि त्यामुळे लोकांच्या हातात पैसाही आला. मात्र, बऱ्याच दिवसांनी खर्च करण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने अनेकांना बजेटच्या वर जावे लागले. अशा परिस्थितीत त्यांची आर्थिक स्थिती थोडी गडबड झाली. आता लोक सणासुदीच्या काळात होणारा प्रचंड खर्च कसा तरी पेलायचा मार्ग शोधत आहेत.

15

सण-उत्सवात लोकांनी दागिने, गॅजेट्स, भेटवस्तू, उपकरणे यावर मनसोक्त पैसे खर्च केले. आता त्यांचे बजेट कोलमडले आहे. परिणामी, ते आता या खर्चाचे व्यवस्थापन करण्याचे मार्ग शोधत आहेत, जेणेकरून त्यांची आर्थिक स्थिती पुन्हा रुळावर येऊ शकेल. अशा परिस्थितीत काही मार्ग आहेत, जे तुमची गाडी रुळावर आणतील. (फोटो- न्यूज18)

25

पर्सनल लोन घेऊन तुम्ही तुमच्या खर्चाचा भार कमी करू शकता. तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असल्यास, तुम्हाला अगदी स्वस्त दरात प्री-अप्रूव्ड पर्सनल लोन मिळेल, जे तुमच्या जवळपास सर्व अल्पकालीन आर्थिक गरजा पूर्ण करू शकतात. आजच्या काळात यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन अनेक कागदपत्रे पूर्ण करण्याचीही गरज नाही. (फोटो- न्यूज18)

35

लोकांनी क्रेडिट कार्डचा अतिवापर टाळावा, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्वरीत पेमेंट करून तुम्ही कर्जापासून मुक्त होऊ शकता. मात्र, बरेचदा असे दिसून येते की लोक क्रेडिट कार्डवरून मोठी पेमेंट करून कर्जाच्या जाळ्यात अडकतात. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते तुम्ही क्रेडिट कार्डऐवजी पर्सनल लोनला प्राधान्य द्यावे. (फोटो- न्यूज18)

45

तुमची आर्थिक गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी, तुम्ही अनावश्यक खर्च कमी करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तुमचे आर्थिक प्राधान्यक्रम ठरवा. सुट्ट्या, बाहेर फिरायला जाणे, जेवणासाठी रेस्टॉरंटमध्ये जाणे इत्यादींवर काही प्रमाणात अंकुश ठेवला पाहिजे. (फोटो- न्यूज18)

55

जर तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवले तर सुरुवातीला थोडी बचत झाल्यासारखे वाटेल. पण, दीर्घकाळात तुम्हाला त्याचे महत्त्व दिसेल. खर्च कमी करणे हा जास्तीत जास्त बचत करण्याचा एक प्रभावी मार्ग असल्याचे तज्ञांचे मत आहे. (फोटो-न्यूज 18)

  • FIRST PUBLISHED :