तुम्ही जर NPS खातं उघडलं असेल आणि त्यामध्ये काही महिन्यांपासून तुम्ही पैसे भरत नसाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. NPS खात्याववर लॉगइन होत नसेल तर तुमचं खातं फ्रीज झालेलं असू शकतं.
NPS खातं गोठवलं जाण्याचं प्रमुख कारण म्हणजे वेळेत पैसे न भरणं, तुम्हाला दर वर्षात कमीत कमी 1000 रुपये खात्यावर जमा करणं बंधनकार आहे. जर खात्यावर पैसे भरले नाहीतर तर खातं गोठवलं जातं.
आपण गोठविलेले खाते पुन्हा सुरू करू शकता. आपण हे ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे करता येतं.
ते ऑनलाइन अॅक्टिव्हेट करण्यासाठी तुम्हाला ई-एनपीएस पोर्टलवर जाऊन 500 रुपये सक्तीनं गुंतवणूक करावी लागेल. यानंतर तुमचं खातं सुरू होऊ शकतं.
ऑफलाइन सुरू करण्यासाठी तुम्हाला पॉइंट ऑफ प्रेझेन्स सर्व्हिस प्रोव्हायडर्सवर (पीओपी-एसपी) जावे लागेल. येथे आपल्याला अर्ज, योगदान आणि दंड भरावा लागेल. दोन्ही मोडमध्ये 100 रुपये दंड आकारण्यात येणार आहे.