देशात पुन्हा एकदा नोटबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2000 रुपयांची नोट ही चलनातून बाद होणार आहे. 30 सप्टेंबरपर्यंत अखेरची मुदत असणार आहे. त्याआधी बँकेत जाऊन नोट बदलायच्या आहे.
23 मे 2023 पासून नागरिकांना बँकेमध्ये 2 हजार रुपयांच्या नोटा जमा करता येणार आहेत.
एकावेळी नागरिकांना 20 हजार रुपयांपर्यंतच्याच 2 हजार रुपयांच्या नोटा बदलून मिळणार आहेत. तसंच बँकांनी आतापासूनच 2 हजार रुपयांच्या नोटा देणं बंद करावं, असे आदेशही आरबीआयने केले आहेत.
मार्च 2017 पर्यंत दोन हजार रुपयांच्या 89 टक्के नोटा चलनात होत्या, 31 मार्च 2018 ला ज्याची एकूण किंमत 6.73 लाख कोटी रुपये होती. 31 मार्च 2023 ला हीच रक्कम 3.62 लाख कोटी एवढी झाली, जी 10.8 टक्के होती.
2016 साली देशभरात नोटबंदी झाल्यानंतर 500 आणि एक हजारच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या. या नोटाबंदीमुळे तूट भरून काढण्यासाठी आरबीआयने 2 हजार रुपयांच्या नोटांच्या छपाईला सुरूवात केली.
. 2018-19 सालीच आरबीआयने 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद केली होती.
गरिकांनी बँकांमध्ये जाऊन या नोटा बदली करून घेण्याचं आवाहन आरबीआयने केलं आहे. 30 सप्टेंबरपर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा नागरिकांना बदलून मिळणार आहेत.