मुंबई : तुम्ही UPI पेमेंट वापरता पण कधी विचार केला आहे का? की तुम्ही एकदा दिवसात किती पेमेंट करू शकता. आज आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देणार आहोत. तुम्ही एकदा दिवसात किती ट्रान्झाक्शन करू शकता हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे.
SBIच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, स्टेट बँक ऑफ इंडिया भारतातील सर्वात मोठी बँक आहे. एसबीआयला यूपीआय व्यवहारांसाठी एक लाख रुपयांची मर्यादा आहे. याशिवाय याच्या दैनंदिन व्यवहाराची मर्यादाही एक लाख रुपये आहे.
आयसीआयसीआय बँकेची यूपीआय व्यवहार मर्यादा आणि दिवसाला 10,000-10,000 रुपये आहे. मात्र गुगल-पे युजर्ससाठी दोन्ही मर्यादा 25 हजार रुपये आहेत.
पंजाब नॅशनल बँकेची व्यवहार मर्यादा 25 हजार रुपये आहे, तर दैनंदिन यूपीआय व्यवहार मर्यादा 50 हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे.
बँक ऑफ इंडियाची यूपीआय व्यवहार मर्यादा आणि दररोजची मर्यादा प्रत्येकी 1 लाख रुपये आहे.
खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेचा यूपीआय व्यवहार आणि एचडीएफसीमध्ये दररोजची मर्यादा 1 लाख रुपये आहे. मात्र, नव्या ग्राहकाला पहिल्या 24 तासांसाठी केवळ 5 हजार रुपयांची मुभा देण्यात आली आहे.